Who Is Bhavna Chauhan: रणवीर अन् जॉनी सिन्ससोबतच्या 'त्या' जाहिरातीमुळे चर्चेत आलेली 'भावना चौहान' आहे तरी कोण?

सोशल मीडियावर भावना चौहान (Who Is Bhavna Chauhan) नावाची सेलिब्रेटी आता चर्चेत आली आहे.
Bhavna Chauhan tv actress
Bhavna Chauhan tv actress

Who Is Bhavna Chauhan : भावनानं त्या जाहिरातीमध्ये काम कऱणं हे तिच्या चाहत्यांना काही केल्या आवडलं नाही. त्यामुळे भलेही ती सध्या प्रचंड लोकप्रिय होत असली तरी नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. या सगळ्या प्रकरणावर भावनानं आपल्याला याविषयी काहीही माहिती नव्हतं अशी प्रतिक्रिया दिली होती. यात भावना चौहान आहे तरी कोण याचा नेटकऱ्यांनी शोध घेण्यास ((Know Who is Bhavana Chauhan) सुरुवात केली आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि पोर्नस्टार जॉनी सिन्ससोबत (Johnny Sins)केलेल्या त्या जाहिरातीमुळे भावना ही चर्चेत आली आहे. त्यावर टीव्ही मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी त्यावर तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली आहे. कुणी काही म्हटले तरी भावनाला एकाचवेळी दोन प्रसिद्ध सेलिब्रेटींसोबत जाहिरातीमध्ये झळकण्याची संधी मिळाली. याबद्दल तिचं चाहत्यांनी कौतुकही केलं आहे.

त्यानंतर ती मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली....

रणवीर सिंग एकीकडे जाहिरांतीमधून लोकप्रियता कॅश करत असताना त्यात आता भावनाचे नाव घेतले जाऊ लागले आहे. तिनं रणवीर आणि जॉनी सिन्ससोबत केलेल्या (Bhavna Chauhan Latest News) त्या एका जाहिरातीनं तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं आहे. मात्र त्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात ट्रोलही झाली आहे. तिनं जॉनी सिन्स सोबत काम करणं हे तिच्या काही चाहत्यांना आवडलेलं नाही असेही बोलले जात आहे.

चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातही केलंय काम...

भावनाच्या प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास तिनं यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राच्या हंसी तो फसी नावाच्या चित्रपटामध्ये काम केलेआहे. तसेच तिनं प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या शिकारामध्ये भूमिका केली आहे. टीव्ही मनोरंजन विश्वात तिचा वावर आहे. तिनं रजिया सुलताना नावाच्या मालिकेत काम केले आहे. याशिवाय इतर काही मालिकांमध्ये ती चमकली आहे.

जॉनी सिन्ससोबत जाहिरात करण्यावर काय होती पहिली प्रतिक्रिया?

भावनाला पहिल्यांदा त्या जाहिरातीविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, मला पहिल्यांदा वाटले प्रसिद्ध रेस्लर जॉन सिनासोबत भूमिका करायची आहे. नंतर कळालं की, मला पोर्नस्टार जॉनी सिन्ससोबत काम करायचेआहे. भावनानं देखील तिच्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ केलं आहे.तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com