काश्मिरी पंडितांच्या हत्येचा कट रचणारा बिट्टा कराटे कोण आहे? जाणून घ्या

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरनं साकारलेल्या या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा होतेय.
Aactor Chinmay Mandlekar (as bitta in The Kashmir Files) & Real Bitta karate(RIght)
Aactor Chinmay Mandlekar (as bitta in The Kashmir Files) & Real Bitta karate(RIght)Google

'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir files) या सिनेमानं बॉक्सऑफिस कलेक्शनवर नवा विक्रम केला आहे. सिनेमा १०० करोड क्लबमध्ये सामिल होईल असं चित्र आता स्पष्ट होत आहे. कमी बजेटमध्ये बनूनही अशाप्रकारे बॉक्सऑफिसवर कमाई करणारा १९७५ नंतरचा हा पहिलाच सिनेमा असल्याचं ट्रेड अॅनलिस्टचं म्हणणं आहे. या सिनेमात १९९० साली काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत झालेल्या नरसंहारामागचं सत्य मांडण्यात आलं. देशभरातून या सिनेमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सिनेमातील प्रत्येक व्यक्तीरेखेची चर्चा होतेय. त्यातलीच एक चिन्मय मांडलेकरनं(ChinmaY Mandlekar) साकारलेली व्यक्तिरेखा,ज्याचं नावही खूप इंट्रेस्टिंग आहे...बिट्टा कराटे(Bitta Karate). खरं तर बिट्टा कराटे म्हणजे मूळचा फारुख अहमद डार. पण मग तो बिट्टा कराटे म्हणून प्रसिद्ध कसा झाला. सोशल मीडियावर त्याचे काही जुने व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होतायत. चला फारुखचा बिट्टा कसा झाला जाणून घेऊया.

Aactor Chinmay Mandlekar (as bitta in The Kashmir Files) & Real Bitta karate(RIght)
'सकाळी ५ वाजता माझ्यासोबत हे नेहमीच घडतं'; ट्विंकलची मॉर्निंग Good Or Bad?

काश्मिरमध्ये राहणाऱ्या बिट्टाचे म्हणे पाकिस्तानशी संबंध होते. त्यानं भारताविरोधात बंड पुकारण्यासाठी पाकिस्तानात जाऊन दहशतवादाचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. तो जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटचा दहशतवादी होता. फारुख अहमद डार हा उत्कृष्ट कराटे खेळायचा. म्हणून त्याचं नाव बिट्टा कराटे पडलं,असं म्हटलं जातंय. काश्मिरमध्ये अनेकांची हत्या करण्यात बिट्टाचा मोठा हात होता.फुटीरतावादी नेता बनून त्यानं आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतोय अशी स्वतःची प्रतिम निर्माण केली. पण त्याच्या मनात मात्र वेगळंच षडयंत्र सुरू होतं. बिट्टानं पाकिस्तानात शस्त्र चालवण्याचं विशेष प्रशिक्षण घेतलं होतं. मार्शलआर्ट मध्येही त्यानं प्राविण्य मिळवलं. त्यानंतर अनेक वर्षांनी काश्मिरमध्ये परत आल्यावर त्यानं खऱ्या अर्थानं भारताविरोधी कटकारस्थानं रचायला सुरुवात केली. काश्मिरमध्ये नरसंहार सुरू करण्यात त्याचा मोठा हात होता. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं की स्थानिक प्रशासनाला कंटाळून आपण दहशतवादी बनलो.

Aactor Chinmay Mandlekar (as bitta in The Kashmir Files) & Real Bitta karate(RIght)
Miss World 2021:फर्स्ट रनरअप ठरलेल्या अमेरिकन श्री सैनीचं लुधियाना कनेक्शन

काश्मिरधील बहुतांशी काश्मिरी पंडितांना मारण्यासाठी याच बिट्टा कराटेनं सुरुवात केली. १९९०मध्ये त्याला या हत्याकांडासाठी अटक करण्यात आली तेव्हा त्यानं २० हून अधिक हत्या केल्याचं कबूल केलं होतं. पण कोर्टात मात्र त्यानं गुन्हा कबूल करण्यात लबाडी केली अन् पुराव्या अभावी तो सुटला. तो सुटला तेव्हा कोर्ट म्हणालं होतं,''गंभीर आरोप असूनही पुराव्याअभावी आरोपीला सोडावं लागत आहे. ज्यांना शिक्षा व्हायला हवी ते जामिनावर बाहेर मोकाट फिरत आहेत''. सुटका झाल्यानंतर बिट्टा पुन्हा जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंटमध्ये सामिल झाला. आणि त्यानंतर स्वतःला नेता म्हणवून घेत लोकांसमोर आला. मागे पुलवामा हल्ल्यानंतर बिट्टाला एनआयए ने २०१९ मध्ये दहशतवादी फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर केंद्र सरकारनं जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटवर बंदी आणून अनेक त्यातील नेत्यांना देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाले म्हणून अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com