The Vaccine War: नानांनी ज्यांची भूमिका साकारली ते 'डॉ. बलराम भार्गव' आहेत तरी कोण?

Who is Dr. Balram Bhargava from The Vaccine War: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये एका व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. चला जाणून घेऊया कोण आहे ती व्यक्ती?
Who is Dr. Balram Bhargava from The Vaccine War in Real Life:
Who is Dr. Balram Bhargava from The Vaccine War in Real Life:Esakal
Updated on

Who is Dr. Balram Bhargava from The Vaccine War: 'द काश्मीर फाइल्स'नंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचा नवा सिनेमा 'द व्हॅक्सिन वॉर' आणला आहे. 28 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची रिलिजपुर्वी सर्वत्र चर्चा होत आहे. व्हॅक्सिन वॉर आणि भारताची कोविड लस बनवण्याच्या मोहिमेची कहानी या चित्रपटात सांगण्याचा पर्यंत अग्निहोत्री यांनी केला आहे.

या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर. गिरिजा ओक सप्तमी गौडा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आता प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Who is Dr. Balram Bhargava from The Vaccine War in Real Life:
Swachhata Hi Seva Abhiyan: विसर्जनानंतर श्रेयस तळपदेकडून वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेसाठी श्रमदान!

नाना पाटेकर यांनी या चित्रपटात मुख्य भुमिका साकारली आहे. या चित्रपट नाना हे एका डॉक्टरच्या भूमिकेत आहे जे शास्त्रज्ञांची टीम हाताळतात. ही टीम रोज रात्री एकत्र काम करून देशासाठी कोविड लस बनवत आहे.

Who is Dr. Balram Bhargava from The Vaccine War in Real Life:
Disha Patani: "तू जिथेही असशील..", दिशाला जेव्हा येते सुशांतची आठवण

यात नाना पाटेकर यांची व्यक्तिरेखा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)चे माजी महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांच्याकडून प्रेरित असल्याचे बोलले जात आहे. सध्या डॉ. भार्गव दिल्ली एम्समध्ये कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक आहेत.

डॉ. भार्गव यांना वैद्यकीय संशोधन, इनोवेशन आणि आरोग्य सेवेचा 35 वर्षांचा अनुभव आहे. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आठवण येणारी पहिली व्यक्ती ही डॉ. भार्गव असतात.

सर्वसामान्यांना आरोग्यविषयक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. ते AIIMS दिल्ली येथील प्राध्यापक स्टॅनफोर्ड इंडिया बायोडिझाइन सेंटर, स्कूल ऑफ इंटरनॅशनल बायोडिझाइनचे कार्यकारी संचालक देखील आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे.

Who is Dr. Balram Bhargava from The Vaccine War in Real Life:
Kiran Mane: "माझ्या मनावरच्या सगळ्या जखमा भरून काढणारं जगातलं सर्वात मौल्यवान अवॉर्ड..", मानेंची पोस्ट व्हायरल

डॉ. भार्गव यांनी द व्हॅक्सिन वॉर हा सिनेमा पाहिला आहे. त्यांना माहित होत की नाना पाटेकर हे किती दमदार अभिनय करतात. नाना साकारत असलेल्या बलरामच्या भुमिकेतील पात्र हे एक हुशार शास्त्रज्ञ आहे मात्र ते तितकेच वाईट बॉस आहे.

ते आपल्या कनिष्ठांच्या कामाचे कौतुक करत नाही असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. जर आपण कनिष्ठांच्या कामाचे कौतुक केले तर ते कमी काम करतील असा त्यांचा समज असतो.

तर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटातील नानांच्या व्यक्तिरेखेबद्दल खुलासा करताना सांगितले की, ते चित्रपटात अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहे ज्याचा थेट संबंध कोविड-19 च्या स्वदेशी लसीशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com