Kavya Thapar: 'फर्जी'मध्ये शाहिदसोबत बोल्ड सीन्स देणारी काव्या थापर आहे तरी कोण ? गुरुजींच्या आश्रमात करते सेवा अन् सत्संग

काव्या थापर ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.
Kavya Thapar
Kavya Thapar Sakal

आता बॉलीवूड आणि ओटीटीवर असे अनेक चेहरे आहेत, जे खूप लोकप्रिय झाले आहेत किंवा लोक त्यांना खूप पसंत करत आहेत पण तरीही ते लोकांच्या नजरेपासून दूर आहेत. त्यापैकी एक अभिनेत्री काव्या थापर आहे, जी अलीकडेच शाहिद कपूरसोबत 'फर्जी' वेब सीरिजमध्ये दिसली होती.

काव्या थापर ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. काव्याचा जन्म 20 ऑगस्ट 1995 रोजी महाराष्ट्रात झाला. काव्याने नुकतेच एका वृत्तवाहिनीशी खास बातचीत केली असून तिच्या आयुष्याशी संबंधित खास पैलूंवर तिने बरेच काही सांगितले आहे.

काव्या थापर इंडस्ट्रीत नवीन आहे, तिच्या बॉलिवूडकडून कशा आणि काय अपेक्षा आहेत? या प्रश्नावर उत्तर देत ती म्हणाली, बॉलीवूडकडून मला अशी काही विशेष अपेक्षा नाही.

मला जे काही मिळेल त्यात मला माझे 100% द्यायचे आहे. माझ्याकडे जे काही टॅलेंट आहे, मला त्यात सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. माझ्याकडे जे आहे ते अधिक चांगले करायचे आहे.

Kavya Thapar
अवॉर्ड मिळाला म्हणून हुरळून जाऊ नकोस.. Tejaswini Pandit कोणाला म्हणाली?

चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर काही वाईट अनुभव आला आहे का? या प्रश्नावर काव्या म्हणाली, मला वाटत नाही की मला वाईट अनुभव आला आहे. अभिनय हा खेळ नाही हे मला कळले. अभिनेत्री बनणे सोपे नाही.

अलीकडेच शूटिंग करताना माझा अपघात झाला, यावरून मला समजले की एखाद्या अभिनेत्याला सीन करण्यासाठी काय करावे लागते. शिवाय, माझ्या गुरुजींनी माझ्यावर नेहमीच आशीर्वादांचा वर्षाव केला आहे. माझ्याबाबतीत असे काही घडले नाही.

तसेच काव्याला अभिनयाव्यतिरिक्त गाणे, नृत्य आणि पेंटिंग आवडते. तिच्या गुरुजींच्या आश्रमात सेवा आणि सत्संग करायलाही आवडते. तिला फिरायला खूप आवडते. ती कविता देखील लिहिते.

काव्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये तिच्याकडे साऊथचे फक्त तीन चित्रपट आहेत. तसेच काव्या विजय अँथनीसोबत एक चित्रपट करत आहे, जो तिचा तमिळ चित्रपट आहे. एक तेलुगुमध्ये रवी तेजासोबत आणि एक संदीपसोबत चित्रपट करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com