24 वर्षांच्या संसारानंतर Sohail Khan ला घटस्फोट देणारी Seema Khan आहे तरी कोण? | who is Seema Khan Sachdev | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

seema khan and sohail khan
24 वर्षांच्या संसारानंतर Sohail Khan ला घटस्फोट देणारी Seema Khan आहे तरी कोण?

24 वर्षांच्या संसारानंतर Sohail Khan ला घटस्फोट देणारी Seema Khan आहे तरी कोण?

बॉलिवूडमधील महत्त्वाच्या कुटुंबापैकी एक असलेल्या खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट होतो आहे. अभिनेता सलमान खानच्या पहिला भाऊ (Salman khan borther) अरबाज खानपाठोपाठ आता त्याचा दुसरा भाऊ सोहेल खानही घटस्फोट घेतो आहे (Sohail khan Seema khan divorce). सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान दोघांनी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. 24 वर्षांच्या संसारानंतर खान कुटुंबापासून विभक्त होणारी सीमा खान आहे तरी कोण?

सोहेल खान व्यतिरीक्त सीम खानची जगभरात एक वेगळी आहे. 43 वर्षीय सीमा एक फॅशन डिझायनर असून ती मोठ्या स्टार्ससाठी ड्रेस शिवते.

सीमा ही एक पंजाबी कुटूंबातील आहे. लग्नापूर्वी तिने फॅशन डिझायनर करिअर केले होते. तसेच सीमा ही टीम इंडियाचा हिटमॅन कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सचदेवची चुलत बहिण आहे.

हेही वाचा: कोणत्या अभिनेत्रीमुळे 'सोहेल - सीमाच्या' संसाराला गालबोट?, घटस्फोटाची तयारी

सीमा सचदेवने फॅशन ब्रँडदेखील सुरु केला आहे. मुंबईमध्ये तिने स्वतःचे बुटीक्सदेखील सुरु केले आहे. तसेच दुबईमध्ये क्लोदिंग स्टोर नावाने सीमाचे बुटीक सुरु आहे.

यासोबतच सीमा सलून आणि स्पादेखील चालवते जिथे कॅटरीना, करीना, मालायका यांसारख्या स्टार्स भेट देत असतात. सीम ही कोटींची मालकीण आहे. तिचे वडील कॉर्नस्टोर स्पोर्टस आणि एंटरटेनमेंट प्राइव्हेट लिमिटेडचे नॉन एक्जिवक्यूटिव डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत.

हेही वाचा: अरबाजनंतर आता सोहेलच्या संसाराला घरघर! पत्नी सीमाचा घटस्फोटाचा अर्ज

अशी सुरु झाली सोहेल सीमाची लव्हस्टोरी

सोहेल आणि सीमची भेट 1996 मध्ये झाली. त्यानंतर त्यांनी 1998 मध्ये लग्नगाठ बांधली. गेले 24 वर्ष त्यांचा संसास सुखाचा सुरु होता. पण कधी काळी एकमेकांवर खूप प्रेम करणारे सोहेल-सीमा आता वेगळे का होत आहेत, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या कपलने त्याबाबत काहीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ते दोघं बऱ्याच कालावधीपासून एकत्र राहत नव्हते. 2017 सालीही त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती. सीमाने फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइफ (Fabulous Lives of Bollywood Wives) या शोमध्ये काही संकेतही दिले होते.

Web Title: Who Is Seema Khan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top