esakal | जसप्रीत बुमराह अडकला लग्नबंधनात; कोण आहे त्याची पत्नी संजना?
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjana Ganesan

संजनाचे सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स

जसप्रीत बुमराह अडकला लग्नबंधनात; कोण आहे त्याची पत्नी संजना?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोमवारी (१५ मार्च) लग्नबंधनात अडकला. टीव्ही अँकर संजना गणेशनशी त्याने लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत गोव्यात हा लग्नसोहळा पार पडला. जसप्रीत आणि संजना यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी या सोहळ्याला उपस्थित होते. जसप्रीतच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या आधी त्याने बीसीसीआयकडे रजा मागितली होती. त्याच्या काही दिवसांनंतरच जसप्रीतच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. आता जसप्रीत आणि संजना दोघांनीही सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांकडून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

कोण आहे संजना गणेशन?
सोशल मीडिया अकाऊंटवरील बायोमध्ये संजनाने स्वत:विषयी लिहिलं, 'स्टार स्पोर्ट्स इंडियासाठी टिव्ही प्रेझेंटर, डिजिटल होस्ट, मिस इंडिया गर्ल.' संजनाने स्टार स्पोर्ट्सवरील अनेक स्पोर्ट्स शोचं सूत्रसंचालन केलं आहे. क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ दरम्यान 'मॅच पॉईंट' आणि 'चिकी सिंगल्स' या शोचं निवेदनही तिने केलं होतं. संजनाने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. तिने फेमिना मिस इंडिया पुणे सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. 

हेही वाचा : सैफचा तब्बल ८०० कोटी रुपयांचा आलिशान पतौडी पॅलेस!

२०१४ मध्ये संजनाने एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या सातव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. सनी लिओनी आणि निखिल चिनाप्पाने या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. मात्र दुखापतीमुळे तिने या शोमधून माघार घेतली होती. संजनाने प्रिमिअर बॅडमिंटन लिग (PBL) आणि स्टार स्पोर्ट्सच्या 'दिल से इंडिया' या कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं आहे. शाहरुख खानच्या आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या ‘द नाईट क्लब’ या इंटरअॅक्टिव शोसाठीही ती अँकर होती.