का झाली परिणीतीला दुखापत? पहा हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

  • परिणीती चोपडा बॅडमिंटनपटू साइना नेहवालच्या बायोपिकचं काम करतेय
  • बॅडमिंटन कोर्टवर सराव करत असताना तीला दुखापत झाली आहे.

 

बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोपडा बॅडमिंटनपटू साइना नेहवालच्या चरित्रपटासाठी(बायोपिक) काम करत आहे. क्रीडा क्षेत्रावर आधारित या चित्रपटासाठी परिणीती बॅडमिंटन कोर्टमध्ये सराव करत आहे. साइनाच्या खेळाला साजेसा अभिनय हुबेहुब जमायला हवा यासाठी तिचा प्रयत्न सुरू आहे. परंतु कोर्टवर सराव करत असताना तीला दुखापत झाल्याचं तीने सोशल मीडियावर म्हटलं आहे. 

परिणीतीने आपला फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिच्या मानेवर मागे बॅंडएड लावल्याचे दिसत आहे. त्या फोटो सोबत परिणीतीने लिहलंय की, मी आणि साइना चित्रपटाची पुर्ण टीम याची काळजी घेते की, सरावादरम्यान मला दुखापत होणार नाही. तरी हे घडलंय. पुढे ती म्हणतेय की, मी पुन्हा बॅडमिंटनचा सराव सुरू करू शकेन, याआधी जितकं शक्य असेन, तेवढा मी आराम करणार आहे.

तुम्हाला माहित आहे का? की, या चित्रपटाची ऑफर याआधी अभिनेत्री श्रद्धा कपूरलाही मिळाली होती. परंतु नंतर परिणीतीचं नाव निच्छित करण्यात आलं. काही दिवसांपासून परिणीती या चित्रपटा संदर्भातील तयारीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतेय. जेणे करून तिच्या चाहत्यांशी तीला कनेक्ट राहता येईल. त्यामुळे तीचे चाहते तिच्या या नविन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did Parineeti get injured? biopic of sayan nehawal