कपिल शर्मावर स्मृती ईराणी भडकल्या ? | Kapil Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kapil sharma and smirti irani

कपिल शर्मावर स्मृती ईराणी भडकल्या ?

सोनी टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे द कपिल शर्मा शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यामध्ये कलाकारांपासून ते नेत्यांपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. हा शो नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांवरून चर्चेत राहिला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार असल्याची चर्चा होत आहे.

ताज्या वृत्तानुसार, स्मृती इराणी या त्यांचं नवीन पुस्तक 'लाल सलाम' च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये येणार होत्या. आता त्याचा एपिसोड काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे. जेव्हा स्मृती इराणी गेटवर पोहोचल्या तेव्हा गेटकीपरला त्यांना ओळखता आलं नाही, असं सांगितलं जात आहे. स्मृती यांच्या ड्रायव्हरला गार्डने थांबवून आत जाण्यास नकार दिला. ड्रायव्हर आणि गेटकीपरमध्ये बरीच वादावादी झाल्याचं म्हटलं जात आहे, यानंतर संतापलेल्या केंद्रीय मंत्री शूटिंग न करताच परतले.

हेही वाचा: 'जर ते मला अटक करायला आले..'; दुसऱ्या FIR वर कंगनाची प्रतिक्रिया

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, स्मृति या त्यांच्या ड्राइवर आणि अजून दोघांसोबत कपिल शर्मा शोच्या सेटवर शूटिंगसाठी गेल्या होत्या. तेव्हा गेटकीपरने त्यांना ओळखल नाही आणि सेटवर जाण्यास नकार दिला. जेव्हा त्याला सांगितलं की शूटिंगसाठी बोलवण्यात आलं आहे, तेव्हा त्यांने असा कोणताही आदेश आम्हाला देण्यात आला नाही,त्यामुळे तुम्ही आत जाऊ शकत नाही. त्याचवेळी फूड डिलीवरीवाला तेथे आला आणि गार्डने त्याची काहीच विचारपूस न करता त्याला आत जाऊ दिलं. हे बघून स्मृति यांनी प्रचंड राग आला आणि त्या नाराज होऊन सेटवरून निघून गेल्या.

कपिल शर्मा आणि प्रोडक्शन यांना माहिती मिळताच स्मृती इराणी यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा गेटकीपर समजलं की त्याने ज्याला थांबवलं त्या केंद्रीय मंत्री आहेत, तेव्हा तो खूप घाबरला आणि त्याने त्याचा फोन बंद केला आहे.

loading image
go to top