Video: पुरस्कार हुकला तरी बायकोनं Suyash Tilak ला दिलं भन्नाट सरप्राईज, आयुषीनं अख्ख्या घरभर...

आयुषीने सुयशसाठी एक कृती करून त्याचं मन जिकल
 suyash tilak, suyash tilak wife, ayushi bhave
suyash tilak, suyash tilak wife, ayushi bhaveSAKAL

Suyash Tilak - Ayushi Bhave News: अभिनेता सुयश टिळक सोशल मिडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. सुयश आणि त्याची बायको आयुषी भावे सोशल मीडियावर कायम एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात.

बायकोने नवऱ्यासाठी काय करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुयशच्या बायकोने केलेली कृती. आयुषीने सुयशसाठी एक कृती करून त्याचं मन जिकलचं शिवाय त्याचा मुडही चांगला केलाय.

(wife aayushi bhave gave wonderful surprise to suyash tilak)

 suyash tilak, suyash tilak wife, ayushi bhave
आणि Shreya Ghoshal ला पाहताच मराठमोळी गायिका Savanee Ravindra च्या अश्रूंचा बांध फुटला

सुयशला एका पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालं होतं. पण सुयशला विजेतेपदावर मात्र नाव कोरता आले नाही. त्यामुळे सुयश नककीच निराश झाला असणार.

सुयश घरी आला तेव्हा त्याचा गेलेला मुड आनंदी करण्यासाठी सुयशची बायको आयुशीने त्याच्यासाठी खास सरप्राईज प्लॅन केलं होतं. सुयशचं मनोबल वाढवण्यासाठी आयुशीने घरात ठिकठिकाणी चिठ्ठ्या लावून त्यावर खास संदेश लिहिला होता.

सुयशने घरातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करून बायकोसाठी खास भावना व्यक्त केल्यात. सुयश लिहितो.. हे खूप स्पेशल आहे. मी काल रात्री कोणताही पुरस्कार जिंकला नाही पण माझ्या पत्नीने सुंदर सरप्राईज नोट्स बनवल्या आणि खूप प्रेमाने माझे घरी स्वागत केले.

धन्यवाद आयुषी हे फार सुंदर जग आहे. मी यासाठी किती भाग्यवान हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.. फिर से दिल जीत लिया

 suyash tilak, suyash tilak wife, ayushi bhave
Swanandi Berde: लक्ष्याची लेक दिसायला जणू स्वर्गाची अप्सरा

सुयश पुढे लिहितो.. हे पोस्ट करण्याचं कारण म्हणजे आज मला जाणवलेली गोष्ट शेअर करणं म्हणजे तुम्हाला तुमचं काम प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करत राहायचं आहे. आणि तुमच्या कुटुंबाचं तुमच्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमाची प्रशंसा करा.

हे प्रेम ओळखा आणि त्याचा आदर करा. मी हे सर्व पाहून भारावून गेलो आणि मला वाटले की, तुमच्या प्रिय व्यक्तींच्या या छोट्याश्या कृती तुम्ही जगाच्या शिखरावर आहेत याची जाणीव करून देतात. हे कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे.

तुम्ही कोण आहात हे जगाने तुम्हाला सांगितले नाही पाहिजे. विश्वास ठेवा. आपण स्वत:ला चांगले ओळखतो.

अशा शब्दात सुयशने आयुशीचे आभार मानले आणि तिच्याविषयी प्रेम भावना व्यक्त केल्या. सुयश सध्या मी, स्वरा आणि ते दोघे या नाटकात अभिनय करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com