Oscar 2023: Natu Natu गाण्यावर ऑस्करमध्ये होणारा डान्स रद्द? Jr. NTR ने केला धक्कादायक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR, Natu Natu, Oscars 2023, RRR news

Oscar 2023: Natu Natu गाण्यावर ऑस्करमध्ये होणारा डान्स रद्द? Jr. NTR ने केला धक्कादायक खुलासा

RRR in Oscars 2023 News: टॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली ( S S Rajamouli) यांच्या RRR या चित्रपटानं जगभर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील नाटू नाटू गाणं ऑस्करच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे समस्त भारतीयांना Natu Natu गाणं ऑस्कर जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

(Will Jr. NTR and ram charan RRR Natu Natu dance performance at the Oscars?)

गेल्या काही दिवसांपासुन Jr. NTR आणि राम चरण ऑस्कर २०२३ मध्ये नाटू नाटू गाण्याचा सर्वांसमोर लाईव्ह परफॉर्मन्स करणार अशी चर्चा होती. परंतु याविषयी आता Jr. NTR ने एका मुलाखतीत खुलासा केलाय त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Jr. NTR म्हणाला, "मला वाटत नाही की असे काही घडेल. मी ते घडण्याची वाट पाहत होतो. पण, दुर्दैवाने, आम्हाला रिहर्सल करायला वेळ मिळाला नाही. कारण आम्हाला जगातील सर्वात मोठ्या स्टेजवर जाऊन उगाच काहीही नाचायचे नाही.

Jr. NTR पुढे म्हणाला, " आम्ही दोघेही व्यस्त होतो. कदाचित राम चरण देखील ऑस्करच्या सगळ्या गडबडीत व्यस्त होता. त्यामुळे मला नाही वाटतं आम्ही Natu Natu गाण्यावर डान्स करू.

आमचे संगीत दिग्दर्शक MM कीरवाणी, गाण्याचे गायक राहुल हे गाणं गाण्याची शक्यता आहे. मला वाटते की आम्ही हा सोहळा फक्त बघणं हि गोष्ट खूप छान असेल. कारण माझे पाय पुन्हा दुखू लागले आहेत."

अशा मिश्किल अंदाजात Jr. NTR ने खुलासा केला. त्यामुळे Jr. NTR आणि रामचरण नाटू नाटू गाण्यावर डान्स करण्याची शक्यता कमी आहे.

ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल साँग कॅटगिरीमध्ये RRR च्या नाटू नाटू ला नॉमिनेशन मिळाले आहे. ९५ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये नाटू नाटूला मिळालेलं नॉमिनेशन हे समस्त भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

दरम्यान लॉस एंजेलिसमध्ये असलेल्या सर्वात मोठ्या थिएटरमध्ये RRR चे स्क्रिनिंग पार पडणार आहे. त्याला चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली, रामचरण, Jr. NTR आणि संगीतकार एमएम किरावानी उपस्थित राहणार आहेत.