'महाभारत' मोठ्या पडद्यावर;अर्जुन-कर्णाच्या भूमिकेत हे दोन कलाकार...

एस.एस.राजामौली लवकरच सुरू करणार या ड्रीम प्रोजेक्टवर काम...
S.S.Rajamouli,Mahabharat image
S.S.Rajamouli,Mahabharat imageGoogle

एस.एस.राजामौली(S.S.Rajamouli) यांची दिग्दर्शक,पटकथालेखक आणि निर्माता अशी ओळख. मघधीरा,ईगा,बाहुबली अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. 'बाहुबली' या चित्रपटाने त्यांना खरी ओळख करून दिली. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'आरआर आर' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तगडी स्टारकास्ट असण्यासोबतच बाहुबलीपेक्षाही हा सिनेमा बिगबजेट आहे या बातम्यांची चर्चा आहे. हा सिनेमा दृश्यात्मक दृष्ट्या भव्य आणि आकर्षक झाला असून स्वातंत्र्यपूर्व म्हणजे जवळजवळ 1920 सालातल्या भारतावर बेतलेला आहे. स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू यांच्या तरुणपणातील दिवसांवर आधारित या सिनेमाची एक काल्पनिक कथा आहे. या सिनेमात कोमाराम भीम यांची भूमिका ज्युनियर एनटीआर ने आणि राम चरणने अल्लुरी सीतारामराजू यांची भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त अजय देवगण,आलिया भट्ट असे बॉलीवूडचे तगडे कलाकारही या सिनेमात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं आलियाचं साऊथ इंडियन भाषेत बोलणं आणि सिल्कच्या साड्या नेसणं याचीही चर्चा मोठी झाली.

S.S.Rajamouli,Mahabharat image
2023 मध्ये शाहरुख-सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र;लवकरच सिनेमाची घोषणा...

बरं आता हा मोठा सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही तर राजामौली यांनी त्यांच्या आणखी एका ड्रीम प्रोजेक्टची घोषणा केली आहे. आता प्रथेप्रमाणे राजामौली यांचा हा सिनेमाही 'लार्जर दॅन लाइफ' असेल यात शंकाच नाही. या सिनेमाचं नाव आहे 'महाभारत'. '' हा आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या आपण कथा लिहितोय. मूळ 'महाभारत' हा या कथेचा अविभाज्य भाग असला तरी माझ्या सिनेमाला माझ्या दृष्टीकोनाचा टच असेल. हातात तलवार,गदा किंवा धनुष्यबाण घेणारी पात्र पडद्यावर दिसली नाहीत तरी महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीरेखेचा स्वभाव,गुणवैशिष्टय मी माझ्या लेखणीतनं सिनेमातील प्रत्येक पात्रात उतरवणार आहे. हे सांगतानाच राजामौली यांनी आपल्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मला पुन्हा ज्युनिअर एन टी आर आणि राम चरण ला एकत्र घेऊन काम करायला आवडेल असंही नमूद केलं आहे.

Junior NTR, Ram Charan
Junior NTR, Ram CharanGoogle

'महाभारत' हा विषय युनिव्हर्सल विषय आहे त्यामुळे ते लक्षात ठेवून मला सिनेमाचं कथानक लिहावं लागतंय,स्टार्सचा विचार करून मी लिहिणार नाही हे नक्की. कारण सिनेमाचा खरा हिरो सिनेमाची स्टोरी असते,स्टार्स नाही हे मी मानतो. ते फक्त माध्यम आहेत त्या ख-या हिरोला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे. आता सिनेइंडस्ट्रीत एकच चर्चा आहे की महाभारतातला अर्जुन आणि कर्ण या महत्त्वाच्या व्यक्तीरेखांपैकी कोणती भूमिका हे दोघे साकारणार आहेत. कारण जर महाभारत पाहिलं तर अर्जुन आणि कर्ण यांच्यातला वाद हा सर्वप्रचलित आहे आणि सिनेमाचं कथानक त्याभोवती फिरणारं असू शकतं असा प्राथमिक अंदाज लावला जातोय. आता प्रत्यक्षात सिनेमात कोण असणार आणि राजामौली यांचं महाभारताचं न्यू व्हर्जन किती रंजक असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com