विल स्मिथने घेतली सदगुरुंची भेट; फोटो झाले व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

देव तुला यश देवो, धर्म तुला नेहमीच चांगल्या दिशेने जाण्यास मार्गदर्शन करेल. असे सदगुरुंनी म्हटले आहे. आध्यात्मिक गुरु सदगुरु यांनीही आपल्या सोशल अकाऊंटवरुन विल स्मिथच्या भेटीचे फोटो प्रसिध्द केले आहेत.

मुंबई - ज्यांनी परशुट ऑफ हॅपिनेस पाहिला आहे त्यांना विल स्मिथच्या अभिनयाचे प्रचंड कौतूक असते. त्याचा येणारा प्रत्येक सिनेमा ते आवर्जुन पाहतात. जगभरात विलच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. भारतातही विलच्या फॅन्स भरपूर आहे. विलने नुकतीच सदगुरु जग्गी वासुदेव यांची भेट घेतली आहे. आपल्या परिवारासह त्याने घेतलेल्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. सदगुरुंनी त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

देव तुला यश देवो, धर्म तुला नेहमीच चांगल्या दिशेने जाण्यास मार्गदर्शन करेल. असे सदगुरुंनी म्हटले आहे. आध्यात्मिक गुरु सदगुरु यांनीही आपल्या सोशल अकाऊंटवरुन विल स्मिथच्या भेटीचे फोटो प्रसिध्द केले आहेत. एक सुंदर आणि आनंददायी कुटूंब या शब्दांत त्यांनी विलला शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीविषयी त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. सदगुरु म्हणतात,  विलला भेटणे माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता. त्याचे कुटूंब खूप सुंदर आहे. मी त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. विल आणि सदगुरु यांच्यात काही वार्तालाप सुरु आहे असे फोटो व्हायरल झाले आहेत.

या पोस्टला आतापर्यत 40 हजाराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. त्यांच्या फोटोला अभिनेता सुझान बर्नेट यानेही कमेंट दिली आहे. सदगुरु यांना भेटणारा तो भाग्यवान कोण आहे, असा प्रश्न त्याने विचारला आहे. या दोघांना एकत्र पाहणे खरचं आनंददायी आहे. अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. 2019 मध्ये विल हा हरिव्दार येथे गंगा आरती सोहळ्यात सहभागी झाला होता. त्यावेळच्या आठवणी त्याने शेयर केल्या आहेत. या अनुभवाविषयी विल म्हणतो, देव तुम्हाला तुमच्या अनुभवातून भेटेल. असे मला माझ्या आजीने सांगितले होते. ती काही वर्षांपूर्वी भारतात आली होती. या देशातील लोकं खूप छान आहेत. निसर्ग आनंद देणारा आहे. तसेच संस्कृती खूप काही शिकवणारी आहे. जगण्याच्या विविध टप्प्यांवर ती उपयोगी पडते. असे विलने म्हटले आहे.

 बराचकाळ विलेचं त्याच्या चाहत्याला दर्शन झालेलं नाही. तो आता आगामी किंग रिचर्ड या चित्रपटांत दिसणार आहे. हा चित्रपट महान टेनिसपटू व्हिनस आणि सेरेना विल्यम्स यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Smith meets Sadhguru shares pics