विद्या पुन्हा साकारणार मोंजोलिका? 

विद्या पुन्हा साकारणार मोंजोलिका? 

मुंबई : 'भूलभुलैया’ चित्रपट म्हटले की भयावह माेंजोलिका म्हणजेच अभिनेत्री विद्या बालनचा चेहरा आजही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो. २००७ मधील सुपरहिट हिंदी चित्रपटांच्या यादीत ‘भूलभुलैया’ने मानाचे स्थान मिळवले.

आता त्या चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एकदम नवी स्टार कास्ट आहे त्याची. विशेष म्हणजे, ‘भूलभुलैया’च्या पहिल्या भागात विद्यावर चित्रित करण्यात आलेले ‘आमी जे तोमार’ गाणे दुसऱ्या भागात रिक्रेएट करण्यात येणार आहे आणि त्यासाठी तिच्याच नावाची चर्चा आहे.

‘आमी जे तोमार’ गाणे रसिकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते. शिवाय विद्याच्या कमाल अभिनयाने चित्रपटाला चार चाँद लागले होते... पण, विद्या ‘भूलभुलैया’च्या दुसऱ्या भागात हे गाणे करायला तयार होणार का, हे पाहावे लागेल.

web title : will vidya play monjolikas role again

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com