#HappyBirthdayAmitabhBachchan : 'बिग बी' तुम जिओ हजारो साल...

amitabh bachchan
amitabh bachchan

मुंबई : चित्रपटसृष्टीत 'बिग बी' अशी ओळख असलेल्या शहनशाह अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिवस! हिंदी चित्रपटजगत गाजवलेल्या बच्चन यांनी आज 76व्या वर्षात पदार्पण केले आहे. सामान्य नागरिकांपासून सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी आज बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

उत्तर प्रदेशमधील अलाहाबादमध्ये 11 ऑक्टोबर 1942 मध्ये त्यांचा जन्म झाला. हरिवंशराय बच्चन व तेजी बच्चन यांच्या पोटी जन्मलेल्या अमिताभ यांनी 1970 मध्ये अँग्री यंग मॅन अशी ओळख निर्माण केली. जंजीर, आनंद, शोले, डॉन, अग्नीपथ व अलीकडच्या काळातले पिकू, पिंक, वजीर हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेले. कौन बनेगा करोडपती या हिंदी रिअॅलिटी शोमद्वारे बिग बींनी कमबॅक केले व एव्हरग्रीन अमिताभ बच्चन यांची उत्साही झलक जगाला दाखवून दिली. 

बिग बी, शहनशाह, अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com