Khyali Saharan: स्टँड-अप कॉमेडिन ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप; नोकरीचे आमिष दाखवून..

या प्रकरणी कॉमेडिन ख्याली सहारनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Women accuse standup comedian of rape, FIR ledged
Women accuse standup comedian of rape, FIR ledgedsakal

Khyali Saharan : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन ख्याली सहारन यावर बलात्कार केल्याच्या आरोप करण्यात आला असून या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरी देतो असे आमिष दाखवून जयपूरमधील एका हॉटेलात नेवून 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा हा आरोप आहे. या प्रकरणी मंगळवारी 14 मार्च रोजी मानसरोवर पोलीस ठाण्यात ख्याली सहारन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Women accuse standup comedian of rape, FIR ledged)

Women accuse standup comedian of rape, FIR ledged
Sharad Ponkshe: हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय?.. शरद पोंक्षे यांनी थेटच सांगितलं.. ऐकाच!

ख्याली सहारन याने ग्रेट इंडियन चॅलेंज सीजन 2 मध्ये सहभाग घेतला होता. ‘द कपिल शर्मा शो’या शोमध्ये देखील ख्यालीने हजेरी लावली होती. ख्याली हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. शिवाय तो आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे.

एका तरुणीला नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने जयपूर, मानसरोवर परिसरातील एका हॉटेलात जाऊन मद्यधुंद अवस्थेत ख्यालीने बलात्कार केल्याचा त्या तरुणीने केला आहे. मानसरोवर पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षक संदीप यादव यांनी सांगितलं की, "तरुणीच्या तक्रारीनंतर ख्यालीविरुद्ध आयपीसी कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस सध्या तापस करत असून ही घटना सोमवारी, 13 मार्च रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रीगंगानगर येथील रहिवासी असलेली ही महिला एका फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. साधारण एका महिनाभरापूर्वी ती नोकरीच्या संदर्भात ख्यालीच्या संपर्कात आली होती.

पोलिसांनी सांगितले की, 'आरोपी कॉमेडियन ख्यालीने एका हॉटेलमध्ये दोन रुम बुक केल्या होत्या. एक स्वत:साठी आणि दुसरी दोन्ही महिलांसाठी. तेव्हा ख्यालीने दारू प्यायली आणि महिलांनाही दारू पिण्यास भाग पाडले. त्यावेळी एक महिला खोलीतून निघून गेली आणि ख्यालीने दुसऱ्या तरुणीवर बलात्कार केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com