'काही पुरुषांना 8 मार्चची आठवण करुन देण्यासाठी..',महिला दिनी गाजतेय मिलिंद गवळीची पोस्टWomen's Day 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Gawali Women's Day Special post

Women's Day 2023: 'काही पुरुषांना 8 मार्चची आठवण करुन देण्यासाठी..',महिला दिनी गाजतेय मिलिंद गवळीची पोस्ट

Milind Gawali Women's Day Special post: जागतिक महिला दिनानिमित्तानं जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण सोशल मीडियावर आपले विचार मांडताना दिसत आहेत.

मराठी अभिनेता मिलिंद गवळीन महिला दिना निमित्तानं केलेली पोस्ट सध्या गाजतेय ते त्यानं स्वतःचा स्त्री पेहरावातील फोटो पोस्ट केल्यानं...'आम्ही का तिसरे' या त्याच्या सिनेमात त्यानं तृतीय पंथीयाची भूमिका साकारली होती त्या सिनेमातला तो फोटो आहे.

त्या फोटोसोबत त्यानं समस्त्र पुरुष वर्गाचा कान पिळत महिलांच्या सन्मानार्थ लिहिलेली पोस्ट खूपच वाचनीय आहे. आणि खूप काही शिकवून जाते.

काय लिहिलंय मिलिंदने नेमकं त्या पोस्टमध्ये?(Women's Day 2023:Milind Gawali Women's Day Special post aai kuthe kay karte actor)

मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळतो. त्यानं महिला दिनानिमित्तानं एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं 'आम्ही का तिसरे' सिनेमातील स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

यात साडी नेसलेला मिलिंद खरंतर खूपच सुंदर दिसत आहे. यात त्यांन तृतीयपंथीय व्यक्तीरेखा साकारली होती. सिनेमातील काही आठवणी फोटोतून शेअर करताना मिलिंदनं स्त्री वर्गाचा सन्मान करीत समस्त पुरुष वर्गाला आपल्या पोस्टमधनं चांगलंच सुनावलं आहे. जागतिक महिला दिनाचा इतिहासही मिलिंदनं आपल्या पोस्टमधनं सांगितला आहे.

ही पोस्ट वाचून चक्क लोक त्याला म्हणत आहेत, तुम्ही आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्ध बनून स्त्रीचा अपमानच करताना दिसता पण प्रत्यक्षात स्त्रीसाठीचे तुमचे विचार खूपच मौलिक आहेत.'' अशाच वेगवेगळ्या कमेंट्स मिलिंदच्या पोस्टवर पहायला मिळत आहेत.

मिलिंद आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे,''खरंतर वर्षातले 365 दिवस हे महिला दिनच आहेत, आणि ते असायलाच हवेत.
पण ठीक आहे काही पुरुषांना आठ मार्चला त्याची आठवण करून द्यावी लागते म्हणून आजचा महिला दिन.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले.
काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांचे खूप हाल झाले ,त्यांच्यावर खूप अत्याचार झाले,

आजही परिस्थिती फार बदलली आहे असं नाही आहे.
सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली.
ती खरी आपल्या देशात महिलांच्या जागृतीसाठी सुरुवात होती ,
शिक्षण महत्त्वाचं आहे, नाही पण , चार भिंतीतल्या शाळां मधलं शिक्षण महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर महिलांनी worldly wise होण गरजेच आहे, जे मी माझ्या लेकीला मिथिलेला @mithi_laa तिच्या लहानपणापासून सांगत आलो आहे.

घरातल्या चार भिंतींच्या बाहेर , वास्तवातलं शिक्षण खूपच महत्त्वाचा आहे.
ज्यांना ते मिळालं किंवा मिळवता आलं , त्या आज पुरुषांपेक्षा खूप खूप पुढे निघून गेले आहेत,
निसर्गानेच स्त्रीला इतकं शक्तिशाली बनवला आहे, की त्या गोष्टीची स्त्रीला जाणीव नव्हती, पण एकदा का ती जाणीव झाली की तिला कोणीही अडवू शकत नाही...

आदिशक्ती ती, प्रभूची भक्ती ती, झाशीची राणी ती, मावळ्यांची भवानी ती, प्रयत्नांना लाभलेली उन्नती ती, आजच्या युगाची प्रगती ती.
ती आई आहे, ती ताई आहे,  ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि  सुरुवात नसेल तर  बाकी सारं व्यर्थ आहे.
माऊली तुला शतशत प्रणाम..,,''