...म्हणून नाट्यगृहे लवकर सुरु करा; जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची मागणी...

...म्हणून नाट्यगृहे लवकर सुरु करा; जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची मागणी...

मुंबई : सध्या कोरोनामुळे नाट्यगृहे चार महिने बंद आहेत. त्यामुळे नाट्यव्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकार व कामगारांची आर्थिक अवस्था खूप बिकट झाली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर नाट्यगृहे सुरू करावीत, अशा प्रकारचे एक निवेदन जागतिक मराठी नाट्यधर्मी संघाने राज्याच्या सांस्कृतिक सचिवांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की रंगमंच कामगारांना प्रयोगापूर्वी सोशल डिस्टंसिंगचे पालन कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येईल,  प्रत्येक नाटयगृहांमध्ये नाटकाचे रोज दोनच प्रयोग होतील, प्रत्येक कलाकाराचे मेकअप किटही वेगळं असेल,  नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था ही शासकीय नियमांना गृहीत धरूनच करण्यात येईल, नाटकाच्या मध्यंतरात व नाटक संपल्यावर पोर्चमध्ये तसेच स्वच्छतागृहामध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधी करण्यात येईल, नाटकाच्या प्रयोगाची तिकीट
विक्री ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल, रसिक प्रेक्षकांनी नाट्यप्रयोग सुरू होण्याअगोदर व प्रयोगानंतर कलाकारांना भेटायला येऊ नये अशी विनंती करण्यात येईल. या सगळ्या अटी व नियम पाळण्यात येतील. सरकारी नियमांचे काटेकोर पालन केले जाईल असेही सांगण्यात आले आहे. 

त्यामुळे या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यातील नाटयगृहे व्यवसायासाठी लवकर उपलब्ध व्हावीत जेणेकरून या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या तीन लाख कुटुंबियांना या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत होईल. अशा प्रकारचे निवेदन सांस्कृतिक सचिवांना देण्यात आले आहे. आता लवकरच मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांना प्रत्यक्ष भेटीत देण्यात येणार आहे असे जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर, उपाध्यक्ष महेश मांजरेकर व कार्यवाह दिलीप जाधव यांनी सांगितले. 
---
संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com