"माझ्या नवऱ्याने मला रामायण अन् अमर चित्रकथा भेट दिली"; यामीने शेअर केला प्रेग्नेंसीचा प्रवास

Actress Yami Gautam : काही महिन्यांपूर्वी यामीने ती गरोदर असल्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. याचदरम्यान तिचा आर्टिकल ३७० हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Actress Yami Gautam
Actress Yami Gautamesakal

Actress Yami Gautam

आर्टिकल ३७० या सिनेमामुळे अभिनेत्री यामी गौतम चर्चेत होती. यामी ही प्रेग्नेंट असून तिच्या प्रेग्नेंसीच्या प्रवासाचा अखेरचा टप्पा सुरु आहे. नुकतंच हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या प्रेग्नेंसी जर्नीचा अनुभव शेअर केला.

यामीला तिच्या या अनुभवाबद्दल विचारले असताना ती म्हणाली, "माझं संपूर्ण कुटूंब आता मुंबईत आलं आहे. माझी बहीण सुरीली लवकरच मुंबईत येणार आहे. आम्ही फार पारंपरिक विचारांचे आहोत. त्यामुळे अजून आम्ही मुलाची रूम तयार केली नाहीये. अर्थात आम्ही काही बदल केले आहेत. कारण आपल्याला अर्थात तयारी करावी लागते. बाळाच्या सुरक्षिततेसाठी घरात बदलायच्या गोष्टी अर्थात आम्ही त्याच्या जन्मानंतर करू."

"माझी बहीण जी आईसुद्धा आहे ती कायमच म्हणते की सगळ्यात उत्तम काळ आहे. मला माहित आहे कि  या काळात खूप आव्हानही असतात पण तुम्ही प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय तुम्हाला यातील मजा काळात नाही. आम्ही खूपच उत्सुक आहोत. माझा नवराही खूप उत्सुक आहे. आम्ही खूप चर्चा करतो. तो मला उपयोगी पडतील अशा गोष्टी पाठवतो. त्याने माझ्यासाठी अमर चित्रकथा, रामायण ही पुस्तकं वाचायला आणली आहेत. माझ्यावेळी आणि माझ्या बहिणीवेळी जेव्हा माझी आई गरोदर होती तेव्हा ती ही पुस्तकं वाचायची," असं  यामी म्हणाली. 

Actress Yami Gautam
Albattya Galbattya: 'हा' अभिनेता पुन्हा एकदा साकारणार चिंची चेटकीण, सिनेमाच्या टीझरनं जिंकली मनं

काही महिन्यांपूर्वी यामीने ती गरोदर असल्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. याचदरम्यान तिचा आर्टिकल ३७० हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाने चित्रपटगृहात नुकतेच पन्नास आठवडे पूर्ण केले. याबाबतही ती खूप आनंदी असल्याचं तिने शेअर केलं आणि तिच्या टीमला या यशासाठी शुभेच्छाही दिल्या.

यामीने दिग्दर्शक आदित्य धरसोबत २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. हिमाचल प्रदेशातील पारंपरिक पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं. त्यांच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिने आणि आदित्यने 'उरी' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. यामीने या सिनेमात साकारलेली रॉ एजंटची भूमिका चांगलीच गाजली होती.

Actress Yami Gautam
अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया यांचे 'या' सिनेमातून मराठी सिनेविश्वात पदार्पण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com