esakal | यश राजनं केलं 30 हजार जणांचं मोफत 'व्हॅक्सिनेशन'

बोलून बातमी शोधा

yash raj films
यश राज करणार 30 हजार जणांचं मोफत 'व्हॅक्सिनेशन', मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाला लढा देण्यासाठी भारत सरकारने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. ही लस सध्या सरकारी रूग्णालयामध्ये मोफत दिली जात आहे पण खाजगी रूग्णालयांमध्ये मात्र या लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत आहेत.

यश राज फिल्मच्या (yash raj films ) वतीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, ज्या 30,000 कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीनं मोफत लस देण्यात येणार आहे, त्यांच्या लसीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्व खर्च यश चोप्रा फाउंडेशन करणार आहे. तसेच इंडस्ट्रीमधील 30,000 कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लसीचे डोस उपलब्ध करुन देण्याची मागणी या पत्रामधून केली आहे.यश राज फिल्म्स बरोबरच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज ‌यांनी देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी इंडस्ट्रीमधील कर्मचाऱ्यांसाठी वेगळे लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

img

yash raj photo

इंडस्ट्रीमधील कर्मचाऱ्यांसाठी यश राज फिल्म्सने (yash raj films ) मदतीचा हात पुढे केल्याने सर्व जण त्यांचे कौतुक करत आहेत. या आधी प्रसिध्द अभिनेता चिरंजीवीने बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत लसीकरण मोहिम राबवली होती. चिरंजीवी यांनी २२ एप्रिलाला या मोहिमेचे आयोजन केले होते.

हेही वाचा: कोरोना रूग्णांसाठी 'देसी गर्ल'ने जमवला पाच कोटींचा निधी

हेही वाचा: कंगनाला टिव-टिव भोवली; ट्विटर अकाऊंट केलं सस्पेंड