'ये जवानी है दिवानी' ची ७ वर्ष पूर्ण, करणने शेअर केला खास व्हिडिओ

सकाळ न्यूज नेटवर्क 
Monday, 1 June 2020

'ये जवानी है दिवानी' या चित्रपटाला आज सात वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने या चित्रपटाचे निर्माता करण जोहरने एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंट शेअर केला आहे. 

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला चाहते नेहमीच पसंत करतात. या दोघांचा गाजलेला चित्रपट म्हणजे 'ये जवानी है दिवानी'. या चित्रपटातील या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या  चांगलीच पसंतीस पडली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. आजही अनेकांच्या फेवरेट मूव्ही लिस्टमध्ये या चित्रपटाचे नाव असते. आज या चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक अयान मुखर्जीचा हा गाजलेला चित्रपट ३१ मार्च २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आज सात वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने या चित्रपटाचे निर्माता करण जोहरने एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंट शेअर केला आहे. 

'अरे भूमी.. बॉलर म्हणजे काय? अमिताभ बच्चन यांनाच पडला प्रश्न

या चित्रपटातील बनी आणि नैनाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात खास घर केले. याच आठवणींना उजळा देत करणने व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये रणबीर-दीपिका शिवाय चित्रपटातील काही क्षणांना पुन्हा एकदा उजळा दिला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना करणने लिहिले आहे की,' या मित्रांच्या गॅंगला आपल्या आयुष्यात आल्याला आणि आपल्याला मैत्री आणि प्रेमाबद्दल शिकवलेल्या या चित्रपटाला आज ७ वर्ष पूर्ण झाली. हा एक असा चित्रपट आहे जो प्रत्येक पिढीसाठी बनला आहे. ७ वर्ष 'ये जवानी है दिवानी' ची'.
दीपिका-रणबीरच्या नात्याला पूर्णविराम लागल्यानंतर या जोडीला अयान मुखर्जीने पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आणले होते.  या चित्रपटासोबतच चित्रपटातील सर्व गाणी देखील हिट ठरली होती. 

...आणि ट्विंकलला तब्बल 46 वर्षात पहिल्यांदा मिळालं आईच्या हातचं जेवण

'ये जवानी है दिवानी' चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले असून करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, कल्की कोचलीन, फारुख शेख, आदित्य रॉय कपूर, एवलीन शर्मा, तन्वी आझमी मुख्य भूमिकेत होतें. या चित्रपटाला जरी सात वर्षे पूर्ण झाली असली तरीही आजही हा चित्रपट प्रेक्षकांना पाहताना तितकाच फ्रेश वाटतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yeh jawaani hai deewani turns karan johar deepika padukone get nostalgic share unseen video