Yodha Twitter Review: कुणी म्हणालं, "पैसा वसूल" तर कुणी म्हणालं, "जबरदस्त क्लायमॅक्स"; सिद्धार्थचा 'योद्धा'कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Yodha Twitter Review: 'योद्धा' या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक प्रेक्षकांनी पाहिला. काही नेटकऱ्यांनी या चित्रपाटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Yodha Twitter Review
Yodha Twitter Reviewesakal

Yodha Twitter Review:अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आणि अभिनेत्री राशी खन्ना (Raashii Khanna) यांचा 'योद्धा' (Yodha) हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 'योद्धा' या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक प्रेक्षकांनी पाहिला. काही नेटकऱ्यांनी या चित्रपाटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'योद्धा' पाहिल्यानंतर काय म्हणाले नेटकरी?

योद्धा हा चित्रपट सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात भावनांची रोलर कोस्टर राइड दाखवण्यात आली आहे.हा चित्रपट मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज आहे, असा अंदाज नेटकऱ्यांनी शेअर केलेले रिव्ह्यू वाचल्यानंतर लावला जाऊ शकतो. एका नेटकऱ्यानं योद्धा चित्रपट पाहिल्यानंतर शेअर केलेल्या रिव्ह्यूमध्ये लिहिलं, एक नंबर ॲक्शन पैसा वसुल, या चित्रपटाचा क्लायमॅक्स शानदार आहे. सिद्धार्थ मल्होत्रानं ​​उत्कृष्ट काम केलं आहे.”

आणखी एका युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, "कॅमेरा वर्क, संगीत आणि अभिनय या सिनेमातील सर्व गोष्टी चांगल्या आहेत. दिल्ली बॉय सिद्धार्थ मल्होत्रानं त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात चांगला परफॉर्मन्स दिला आहे"

अनेक जणांनी योद्धा चित्रपटाचं कौतुक केलं आहे. "योद्धा चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राची जबरदस्त एंट्री दाखवण्यात आली आहे.त्याचा स्वॅग आणि त्याची चालण्याची स्टाईल चांगली आहे.", असं एका युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं.

Yodha Twitter Review
Yodha Teaser: हायजॅकर्ससोबत लढणार सिद्धार्थ मल्होत्रा, दिशाचा दमदार अंदाज; 'योद्धा'चा जबरदस्त टीझर रिलीज

'योद्धा'चं बजेट

सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्ना यांच्या योद्धा या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. या चित्रपटाचे बजेट 55 कोटी रुपये आहे, असं म्हटलं जात आहे.

सिद्धार्थचे चित्रपट

हसी तो फसी, एक व्हिलन, कपूर अँड सन्स या चित्रपटात सिद्धार्थनं काम केलं आहे. शेरशाह या चित्रपटातील सिद्धार्थच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता सिद्धार्थचा योद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com