Yogi Adiyanath : 'ए बाळा, जर का मोदींना तू....' योगी आदित्यनाथ कॉमेडियनवर संतापले!

राजीव निगननं तर यापूर्वी कधीही पंतप्रधानांचा अपमान झाला नाही का, त्यावेळी कुणीच काही बोललेलं नाही.
Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal

Yogi Adityanath Angry on commedian Rajeev Nagan : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या सडेतोडपणासाठी ओळखले जाणारे राजकीय व्यक्तिमत्व आहे. गेल्या काही दिवसांपासून योगी हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे ओळखले जातात. योगींनी आता एका कॉमेडियनवर दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

त्याचे काय आहे की, सध्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकांची जोरदार चर्चा आहे. त्या रणधुमाळीला उधाण आले आहे. कर्नाटकमध्ये सत्तेवर येण्यासाठी बीजेपीकडून बड्या नेत्यांना प्रचारासाठी पाचारण केलं जात आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यांनी देखील बीजेपीच्या उमेदवारांचा प्रचार सुरु केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपासून कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यावरही टीका केली होती.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

खर्गे यांनी प्रधानमंत्री मोदी यांना विषारी साप असे म्हटले होते. त्याला काल मोदींनी देखील कडक शब्दांत कॉग्रेसला उत्तर दिले. योगींनी देखील कॉग्रेसवर हल्लाबोल केला होता. मोदींचा अपमान म्हणजे १४० कोटी जनतेचा अपमान आहे. ज्यांनी कुणी अशी टीका केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासगळ्यात राजीव निगन नावाच्या कॉमेडिनयननं केलेली टिप्पणी लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Yogi Adityanath
Makarand Anaspure : मकरंद अनासपूरे 'एसटीचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर'

राजीव निगननं तर यापूर्वी कधीही पंतप्रधानांचा अपमान झाला नाही का, त्यावेळी कुणीच काही बोललेलं नाही. २०१४ पूर्वी कधीही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीत का, २०१४ नंतर वेगळे राष्ट्र आता अस्तित्वात आले आहे. हेच लोक पूर्वी पंतप्रधानांप्रती ज्या भावना व्यक्त करायचे ते कसे होते हे वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही. असेही त्या कॉमेडियननं म्हटले आहे.

Yogi Adityanath
Salman Khan : 'मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित'!, भाईजान असं का म्हणाला?

यावर योगींनी दिलेली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मोदींचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यांच्यावर टीका कुणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी लागेल. भारताचा अपमान करणाऱ्या याप्रकारच्या लोकांचा स्विकारही आपण करता कामा नये. अशा शब्दांत योगींनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Yogi Adityanath
Kangana Ranaut : 'घाबरतोस कशाला, मोदी आहेत ना?'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com