'बाहेरचे असाल तर,एका चेंडूत सात धावा काढाव्याच लागतील'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 10 November 2020

गेल्या काही महिन्यांपूर्वी नेपोटिझमचा वाद समोर आला होता. त्यावरुन बॉलीवूडमधील वाद उफाळून आला होता. दरवेळी यावरुन अनेक कलावंत आपआपली भूमिका मांडत आहेत. यात पंकज त्रिपाठीने त्यावर एक मार्मिक भाष्य केले आहे.

मुंबई - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे चर्चेत आलेल्या अभिनेता पंकज त्रिपाठीला त्याच्या खास अभिनयाबद्दल रसिकांडून कौतूक केले जात आहे. अभिनयाबरोबर तो त्याच्या वक्तव्यांसाठीही प्रसिध्द आहे. सध्या मिर्जापूर मधील कालीन भैय्याच्या भूमिकेत त्याने छाप पाडली आहे. यामुळे पंकज त्रिपाठी सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलीवूडमध्ये आतले आणि बाहेरचे असा वाद नेहमीच रंगला आहे. त्यावरुन टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. अशीच एक प्रतिक्रिया पंकज त्रिपाठीने देऊन पुन्हा त्या वादावर चर्चा घडवून आणली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी नेपोटिझमचा वाद समोर आला होता. त्यावरुन बॉलीवूडमधील वाद उफाळून आला होता. दरवेळी यावरुन अनेक कलावंत आपआपली भूमिका मांडत आहेत. यात पंकज त्रिपाठीने त्यावर एक मार्मिक भाष्य केले आहे. तो म्हणतो, जर तुम्ही बाहेरचे असाल तर तुम्हाला एका चेंडूत सात धावा काढाव्याच लागतील. त्याच्या अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे बॉलीवूडमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा अंदाज बांधता येईल. पंकज याने आपल्या आतापर्यतच्या आठ वर्षांबद्दलच्या संघर्षाविषयी भाष्य केलं आहे. 

कालीन भैया अर्थात पंकज त्रिपाठी हा आता नेटफिल्क्सवरील लुडो या मालिकेत दिसणार आहे. त्याच्या मिर्झापूरमधील अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, मी अजून मिर्झापूरचे काही भाग पुन्हा पाहत आहे. काहीवेळी ते फॉरवर्ड करुन पाहतो. अद्याप माझे 5 भाग पाहायचे राहिले आहेत. मी केवळ माझेच सीन पाहतो असे नाही तर इतरांनीही कशापध्दतीने काम केले आहे ते पाहतो. त्यामुळे वेगळा आनंद मिळतो. मला खरं तर अशाप्रकारच्या मारधाडीचे चित्रपट फारसे आवडत नाही. ज्या चित्रपटांमध्ये 'सादगी', चार्म, ह्युमर, आहे असे चित्रपट मला आवडतात. यावेळी त्याने कोर्ट, तिथी, किल्ला आणि शिप ऑफ थिसीस या चित्रपटांच्या नावांचा उल्लेख केला.

 कमबॅकसाठी तनुश्रीने घटवलं 15 किलो वजन; पाहा कशी दिसते

आता तो अनुराग बसु यांच्या लुडो मध्ये काम करताना दिसणार आहे. त्यात त्याने सत्तु नावाची भूमिका साकारली आहे. त्याचा लुकही चांगलाच व्हायरल झाला आहे. मला ही भूमिका करताना यलो ग्लासेस आणि रेड कलरचे शुज घालायचे होते अशी आठवण पंकजने सांगितली आहे. सत्तुची एक लव स्टोरी आहे. त्याला कुणी गँगस्टर म्हणून ओळखावे असे त्याला वाटत नाही.

हुडहुडी भरविणा-या थंडीत मोनालिसाचा 'करंट'

 यावेळी थोड्या वेगळ्या विषयावर बोलताना कालीन भैया म्हणाला, जर तुम्हाला एक बाहेरचा म्हणून इंडस्ट्रीत संधी मिळाली तर तुम्हाला स्वत;ला सिध्द करावे लागेल. प्रवाहात चालत आलेल्यांपेक्षा तुम्ही वेगळे असाल तर मात्र तुम्हाला एका चेंडूवर सात धावा काढण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. असे मत त्याने यावेळी मांडले. माझ्या आतापर्यतच्या प्रवासावरुन मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मी इंडस्ट्रीला जितकं वाईट समजत होतो तेवढी ती नाही हे मी सांगु शकतो. 
 
 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you get one ball and you must make seven runs said Pankaj Tripathi