"बेबी,तू चुकलास"

श्वेता तिवारी असं कोणाला म्हणाली? जाणून घ्या...
Shweta Tiwari
Shweta TiwariGoogle

श्वेता तिवारी(Shweta Tiwari) म्हणजे टी.व्ही इंडस्ट्रीतला ओळखीचा प्रसिद्ध चेहरा. पण ती तिच्या मालिका,सिनेमांमधील कामामुळे जितकी लक्षात राहिली तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही. याचं मुख्य कारण म्हणजे तिची दोन अपयशी लग्न. तिचं पहिलं लग्न भोजपूरी इंड्स्ट्रीसोबतच हिंदी टी.व्ही जगतातही जास्त अॅक्टिव्ह असणारा अभिनेता,निर्माता,लेखक राजा चौधरी याच्यासोबत झाले होते. पण लग्नाच्या नऊ वर्षानंतर दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना पलक ही मुलगी आहे,जी आता २१ वर्षांची असून हिंदी सिनेमात आपल्या पदार्पणाच्या तयारीत आहे. श्वेताने राजा चौधरीवर मारहाण केल्याचा आरोप करीत घटस्फोटाची मागणी केली होती.

Shweta Tiwari,Abhinav Kohli,Raja Chaudhary
Shweta Tiwari,Abhinav Kohli,Raja ChaudharyGoogle

त्यानंतर काही वर्षांनी श्वेतानं अभिनय क्षेत्रातीलच आपला सहकलाकार अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. सुरुवातीला सगळं आलबेल सुरू असतानाच अचानक बातम्या येऊ लागल्या की श्वेता आणि अभिनवमध्ये वादाची ठिणगी पडलीय. तो वाद श्वेताच्या मुलीवरनं सुरू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. पण पुढे वाद मोठा झाला,चव्हाट्यावर आला अनं श्वेतानं अभिनवसोबत काडीमोड घेतला. अभिनवआणि श्वेताला एक लहान मुलगा आहे. घटस्फोटानंतर त्या मुलाच्या कस्टडीवरूनही या दोघांमध्ये मोठी भांडणं झाली. सार्वजनिक ठिकाणी श्वेता-अभिनवमध्ये झालेल्या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.

Shweta Tiwari
प्रिया-उमेशचा 'घनचक्कर' ड्रामा!

श्वेता आता आपल्या कामात व्यस्त आहे. 'खतरों के खिलाडी' कार्यक्रमात आपलं गेम टॅलेंट दाखवून भारतात परत आल्यानंतर श्वेता पुन्हा काही व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली. पण हे व्हिडीओ मात्र वादाचे नसून तिच्या मुलीसोबतचे आणि वयाची चाळीशी ओलांडूनही ती किती फीट आहे हे दाखवणारे आहेत. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तिने चक्क इन्स्टाग्राम फिल्टरला एका गोष्टीसाठी चुकीचं ठरवलंय. हा इन्स्टाग्राम फिल्टर आपला चेहरा पाहून परफेक्ट वय सांगतो. पण श्वेताच्या बाबतीत मात्र त्याचा अंदाज चुकीचा नाही,साफ चुकीचा ठरलाय. त्यानं ४१ वर्षाच्या श्वेताला २३ वर्षाचं ठरवलंय. आता श्वेता मात्र खुशीत गाजरं खातेय. पहा तिनं शेअर केलेल्या व्हिडीओची झलक.

श्वेता तिवारीच्या या व्हिडीओवर तिचा 'खतरों के खिलाडी' मधला सहस्पर्धक विशाल आदित्य सिंगने कमेंट केलीय आणि तिला 'संतुर मॉम' म्हणून संबोधलंय. श्वेता नेहमीच आपल्या फोटोज् आणि व्हिडीओज् मधनं असं काही हटके पोस्ट करते की त्याला व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. आता तर तिच्या २१ वर्षीय मुलीलाच ती ब-याचदा टक्कर देताना दिसतेय. नव्याने इंडस्ट्रीत पदार्पण करणा-या तिच्या मुलीला म्हणजे पलक तिवारीला श्वेताच अडसर ठरतेय की काय हे आता पहायचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com