esakal | तुम्हाला माहीत आहे का, टीव्ही चॅनल्सचं आता काय होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्हाला माहीत आहे का, टीव्ही चॅनल्सचं आता काय होणार?
  • वाहिनीची ब्रॉडकास्टरने ठरविलेली किंमत संपूर्ण देशासाठी एकच असेल. उदाहरणार्थ 'झी मराठी' या वाहिनीचे मासिक शुल्क 10 रुपये असेल, तर देशातील कुठल्याही शहरात आणि कोणत्याही 'डीटीएच ऑपरेटर'कडून घेतलं, तरीही ही किंमत सारखीच असेल


तुम्हाला माहीत आहे का, टीव्ही चॅनल्सचं आता काय होणार?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : सध्या टीव्ही सुरू केल्यानंतर एक जाहिरात सतत येऊन आदळत आहे.. ती म्हणजे '29 डिसेंबरपासून तुमच्या आवडीचीच चॅनेल्स निवडा' वगैरे! 'ट्राय'च्या नियमांची अंमलबजावणी नव्या वर्षापासून सुरू होणार असल्याने प्रत्येक वाहिनीवर या प्रकारच्या जाहिरातींचा मारा होत आहे. 

नेमकं काय होणार आहे? 
'ट्राय'ने केबल आणि 'डीटीएच'साठी लागू केलेला नियम अचानक आलेला नाही. याची घोषणा 2017 च्या मार्चमध्येच झाली होती. त्यासाठी प्रत्येक ब्रॉडकास्टरला त्यांच्या प्रत्येक चॅनेलच्या मासिक शुल्काविषयी माहिती कळविण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर, 2018 होती.

नव्या नियमानुसार, 100 'फ्री टू एअर' वाहिन्या, तुम्ही निवडलेल्या वाहिन्या आणि सर्व कर मिळून महिन्याला 300 रुपयांच्या पलीकडे खर्च जाणार नाही 

नव्या रचनेमध्ये ग्राहकांना अंदाजे 130 रुपये मासिक शुल्कामध्ये 100 'फ्री टू एअर' वाहिन्या मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला हव्या त्याच वाहिन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्यही देण्यात आले आहे. सध्या ग्राहकांना विविध चॅनेलचे 'बुके' विकत घ्यावे लागतात. अशा प्रकारच्या 'बुके'मध्ये त्या त्या ग्रुपच्या अनेक वाहिन्यांचा समावेश असतो; पण सामान्यत: त्यापैकी एक किंवा दोनच वाहिन्या पाहिल्या जातात. पण 'बुके' घेतल्यामुळे इतर वाहिन्यांचे पैसेही भरावे लागतात. 

नव्या नियमानुसार, 100 'फ्री टू एअर' वाहिन्या, तुम्ही निवडलेल्या वाहिन्या आणि सर्व कर मिळून महिन्याला 300 रुपयांच्या पलीकडे खर्च जाणार नाही, असा एक मतप्रवाह आहे. दुसरीकडे, 'सध्या तुमच्या टीव्हीवर असलेल्या सर्वच वाहिन्या हव्याच असतील, तर मासिक खर्च वाढेल', असाही वेगळा मतप्रवाह आहे. 

'ट्राय'च्या नियमांमध्ये काय आहे? 

  • प्रत्येक वाहिनी स्वतंत्रपणे घेण्याची सुविधा 
  • 'फ्री टू एअर' असलेल्या वाहिन्यांचा 'बुके'मध्ये समावेश करता येणार नाही 
  • प्रत्येक 'डीटीएच' आणि केबलसाठी ब्रॉडकास्टर आणि वाहिन्यांच्या पॅकेजची किंमत सारखीच असेल 
  • 100 'फ्री टू एअर' वाहिन्यांमध्ये 'दूरदर्शन'च्या 26 वाहिन्यांचा समावेश अनिवार्य आहे 
  • प्रत्येक वाहिनी ही एकतर 'फ्री टू एअर' असू शकेल किंवा तिची किंमत जाहीर करणे ब्रॉडकास्टर्ससाठी अनिवार्य असेल 
  • वाहिनीची ब्रॉडकास्टरने ठरविलेली किंमत संपूर्ण देशासाठी एकच असेल. उदाहरणार्थ 'झी मराठी' या वाहिनीचे मासिक शुल्क 10 रुपये असेल, तर देशातील कुठल्याही शहरात आणि कोणत्याही 'डीटीएच ऑपरेटर'कडून घेतलं, तरीही ही किंमत सारखीच असेल 
  • एखाद्या वाहिनीची मासिक किंमत 19 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ती वाहिनी कोणत्याही 'बुके'चा भाग असू शकणार नाही 
  • एखाद्या वाहिनीच्या किंमतीवर जास्तीत जास्त 15 टक्के सवलत देऊ शकतात 
  • एका वर्षामध्ये 'प्रमोशनल ऑफर' दोनदाच देता येऊ शकेल

सध्या ग्राहकांना विविध चॅनेलचे 'बुके' विकत घ्यावे लागतात. अशा प्रकारच्या 'बुके'मध्ये त्या त्या ग्रुपच्या अनेक वाहिन्यांचा समावेश असतो; पण सामान्यत: त्यापैकी एक किंवा दोनच वाहिन्या पाहिल्या जातात. पण 'बुके' घेतल्यामुळे इतर वाहिन्यांचे पैसेही भरावे लागतात. 

loading image