वृंदावनच्या 'त्या' पवित्र ठिकाणी रात्रीचं शूटिंग युट्यूबरला पडलं महागात; कारण.. | YouTuber Gaurav Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Youtuber Gaurav Sharma

वृंदावनच्या 'त्या' पवित्र ठिकाणी रात्रीचं शूटिंग युट्यूबरला पडलं महागात; कारण..

वृंदावनमधील Vrindavan 'निधिवन राज'च्या Nidhivan Raj आत रात्रीच्या वेळी व्हिडीओ शूटिंग केल्याने युट्यूब चॅनलच्या अॅडमिनला पोलिसांनी रविवारी अटक केली. निधिवन राज हे पवित्र स्थान असून तिथे राधा आणि भगवान श्री कृष्ण रात्रीच्या वेळी 'रासलीला' खेळायचे आणि त्यावेळी कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी नाही, असा प्रचलित समज आहे. मात्र त्याठिकाणी जाऊन युट्यूबर गौरव शर्माने YouTuber Gaurav Sharma व्हिडीओ शूटिंग केलं. यामुळे त्याला अटक करण्यात आली. 'गौरवझोन' हा त्याचा युट्यूब चॅनल असून त्यासाठी त्याने 'निधीवन राज'मध्ये शूटिंग केलं होतं.

“गौरव शर्माला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्या साथीदारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती पोलीस अधीक्षक (शहर) मार्तंड प्रकाश सिंग यांनी दिली. चौकशीदरम्यान गौरवने कबूल केलं की, त्याने 6 नोव्हेंबरच्या रात्री त्याचा चुलत भाऊ प्रशांत आणि मित्र मोहित आणि अभिषेक यांच्यासह 'पवित्र' ठिकाणी व्हिडिओ शूट केला होता, असं पोलिसांनी सांगितलं. गौरवने 9 नोव्हेंबर रोजी युट्युबवर व्हिडिओ अपलोड केला होता. मात्र, 'पवित्र' ठिकाणी शूटिंग करण्यास पुरोहितांनी विरोध केल्याने त्याला तो डिलिट करावा लागला.

हेही वाचा: "..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?"; रोहित शेट्टीचा सवाल

निधीवन राजचे पुजारी रोहित गोस्वामी यांच्या तक्रारीनंतर वृंदावन पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 295A आणि आयटी कायद्याच्या कलम 66 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गौरवला याआधीही एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्या पाळीव कुत्र्याला त्याने फुग्याच्या सहाय्याने हवेत उडवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्यावर कारवाई झाली होती.

loading image
go to top