Zaira Wasim Birthday: 'या' कारणामुळे सिक्रेट सुपरस्टारने सोडली चित्रपटसृष्टी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zaira Wasim Birthday

Zaira Wasim Birthday: 'या' कारणामुळे सिक्रेट सुपरस्टारने सोडली चित्रपटसृष्टी...

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये  तीन चित्रपट करुन घराघरात पोहचलेली झायरा वसीम 'दंगल गर्ल' किंवा ‘सिक्रेट सुपरस्टार’ या नावाने ओळखली जाते. तिला बॉलीवूडमधील तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.मात्र तीनच चित्रपटांमध्ये काम केल्यानतंर तिने अभिनय क्षेत्र सोडले. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला होता.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: तेजस्विनी आणि अक्षयमध्ये फुलतोय का प्रेमाचा गुलमोहर?

 झायरा वसीमचा जन्म 23 ऑक्टोबर 2000 रोजी काश्मीरमधील श्रीनगर येथे झाला. झायराने सुरुवातीचे शिक्षणही तिथेच केले. लहानपणापासूनच झायराला अभिनयाची खूप आवड होती असे म्हटले जाते. हा छंद जोपासण्यासाठी झायराने हिंदी चित्रपटांमध्ये येण्याचा निर्णय घेतला.तिच्या चित्रपटसृष्टीत काम करण्याअगोदर तिने 2015 मध्ये मायक्रोसॉफ्टच्या मोबाईल फोन्स आणि टाटा स्कायसारख्या जाहिरातींमध्ये काम केले होते.

हेही वाचा: Jhalak Dikhhla Jaa 10: नाचता नाचता झाला अपघात, रुबिना दीलैकला गंभीर दुखापत...

तिला खरी ओळख आमिर खानच्या 2016 मध्ये आलेल्या ‘दंगल’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने गीता फोगटच्या लहानपणाची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील आभिनयासाठी  झायराला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ती त्यानतंर पुन्हा एकदा आमिर खानसोबत 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटात दिसली.

यानंतर झायराला 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरसोबत दिसली होती. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतरच झायराने चित्रपटसृष्टी सोडण्याची घोषणा केली, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

याचे एक मोठे कारण म्हणजे तिने लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट, ज्यामध्ये ती सांगत होती की, बॉलीवूडमध्ये आल्याने ती अल्लाह आणि इस्लामपासून कशी दूर गेली आहे. झायरा वसीमने सोशल मीडियावर लिहिले की, 'ती तिच्या कामावर खूश नाही कारण ते तिच्या श्रद्धेपासून दूर जात आहे. तिने पुढे लिहिले की, अभिनेत्री बनल्यामुळे ती इस्लामपासून दूर जात  आहे. यामुळे ती फिल्म इंडस्ट्री सोडत आहे. तिचा हा निर्णय हा पुर्णपणे तिचा होता. ती इंस्टारग्रामवर सक्रिय आहे.ती तिचे फोटो पोस्ट करत नाही मात्र तिचे विचार ती त्यावरुन शेअर करत असते.