Zakir's Journey : उपाशी पोटी काढलेले दिवस ते आज बच्चन समोर हॉटसीट, प्रेरणादायी आहे झाकीरचा प्रवास

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन झाकीर खान
Zakir's Journey
Zakir's Journeyesakal

Zakir's Journey : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन झाकीर खानसाठी 'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये सामील होणे हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते. या स्टँडअप कॉमेडियनवर अमिताभ बच्चनही खूपच प्रभावित झाले. यादरम्यान झाकीरने अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्याची गोष्ट शेअर केली.

सोनी टीव्हीच्या क्विझ रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये पाहुणा म्हणून सहभागी झालेला स्टँडअप कॉमेडियन झाकीर म्हणाला की, अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसताच त्याचे लहानपणीचे स्वप्न साकार झाले. किंबहुना, त्याने एपिसोडच्या सुरुवातीलाच धैर्याने सांगितले होते की, त्याला अमिताभ बच्चन यांचे अजूबा आणि शहेनशाह हे चित्रपट खूप आवडतात. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर झाकीर खानने सांगितलं की, मला अमिताभ बच्चनचा शो खूप मनोरंजक वाटतो आणि जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा केबीसी बघायला आवडतं.

Zakir's Journey
Tech Tips : एकाच डेस्कटॉपवर अनेक WhatsApp वापरता येतात का?

समोर हॉट सीटवर बसलेल्या झाकीर खानवर अमिताभ बच्चन खूपच प्रभावित झाले होते. झाकीर खानने बिग बींसमोर त्याचा प्रवास आणि संघर्षाचा काळ याबद्दल सांगितलं.झाकीर खान म्हणाला, "माझ्या वडिलांनी मला मोठं हो असं सांगितलं होतं. पण काय करून मोठं होतात हे मला माहीत नव्हतं. माझे वडील फार कमी बोलतात, पण त्यांच्या मुलाने लोकांशी मोकळेपणाने बोलावं असं त्यांना नेहमी वाटायचं."

Zakir's Journey
Cleaning Tips : सणाच्या आधी कळकटलेले स्वीचबोर्ड असे करा चकचकीत, दिसतील एकदम नव्यासारखे!  

आपल्या प्रवासाबद्दल बोलताना झाकीर खान म्हणाला, "मी दिल्लीला गेलो होतो आणि तिथे माझ्या एका मित्राने मला स्टँडअप कॉमेडीबद्दल सांगितले. खरं सांगायचं तर माझा पहिलाच प्रयत्न खूप वाईट होता. पण मी हार मानली नाही. दुसरी वेळ थोडी चांगली होती, त्यानंतर तिसर्‍यांदा माझा शो चांगला झाला आणि मग मला समजलं की ही माझी खासियत आहे आणि मी ही त्याचा आनंद घेतोय.

Zakir's Journey
Tech Tips : AI च्या मदतीने Hackers चा नवा डाव, मेसेज नाही तर आता थेट फोनच येणार, उचलला तर होईल मोठं नुकसान

झाकीर म्हणाला, "मी तीन वर्षे दिल्लीत राहिलो आणि माझ्याकडे नोकरी नव्हती. मी माझ्या पालकांशी खोटं बोललो की मला नोकरी मिळाली आहे. त्यावेळी माझा एक मित्र होता आणि आम्ही खूप जवळ होतो. जेवण असेल तर एकत्र जेवायचे, नाहीतर उपाशी राहायचो. निदान तो एकटा उपाशी मरणार नाही असा आत्मविश्वास तरी होता.

Zakir's Journey
Health Tips : घरातला हा एक मसाला तुमची सांधेदुखीची कायमची सुट्टी करेल, लगेच करा हा प्रयोग

रिकाम्या पोटी जगणं काय असतं ते मी पाहिलं आहे. आज तुम्हाला भेटल्यानंतर असं वाटतं की सर्वकाही शक्य आहे. सिडनी ऑपेरा हाऊस, रॉयल अल्बर्ट हॉल, याठिकाणी मी लवकरच परफॉर्म करणार आहे. आता मला आत्मविश्वास मिळाला आहे की मी सर्व काही करू शकेन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com