ZHZB Collection Day 4: सारा- विकीचा चित्रपट 'लई भारी'... जिंकतोय प्रेक्षकांची मनं! कमाईच्या आकड्यात वाढ

Zara Hatke Zara Bachke Collection Day 4:
Zara Hatke Zara Bachke Collection Day 4: Esakal

Zara Hatke Zara Bachke Collection Day 4: बॉलीवूड स्टार विकी कौशल आणि सारा अली खान यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट २ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लक्ष्मण उत्रेकर दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 22 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

त्यातच आता या चित्रपटाच्या विकेंडनंतर किती कमाई केली हे जाणुन घेण्यासाठी चाहते उत्सूक आहेत. तर दूसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Zara Hatke Zara Bachke Collection Day 4:
Bal Shivaji: परशा साकारणार 'बाल शिवाजी', राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित जरा हटके जरा बचकेने पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई होती. त्यातच वीकेंडला चित्रपटाच्या कमाईतही वाढ झाली आहे.

या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 5.25 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई 7.25 कोटींवर पोहोचली आहे.

तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने 9.90 कोटींची कमाई केली. जी निर्मात्यांसाठी खुपच आश्चर्यकारक होती.

Zara Hatke Zara Bachke Collection Day 4:
Neha Kakkar Birthday: चौथ्या वर्षांपासून गायन! ज्या शोमधून बाहेर काढलं त्याच शोची बनली जज..असा आहे नेहाचा जीवनप्रवास

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेड रिपोर्टनुसार, 'जरा हटके जरा बचके' ने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 3.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यासह आता चित्रपटाची एकूण कमाई 26.39 कोटींवर गेली आहे. मात्र अधिकृत आकड्यात थोडा बदल असू शकतो.

आता कमाईचे आकडे असेच असल्याच चित्रपट यंदाच्या हिट चित्रपटांच्या यादित सहभागी होइल यात काही शंका नाही.

Zara Hatke Zara Bachke Collection Day 4:
Kangana Ranaut Video:कंगना अन् सलमानचा एकत्र चित्रपट! 'त्या' व्हिडिओनंतर नेटकऱ्यांचा कंगनाकडे हट्ट..

चित्रपटाच्या सुरवातीला बाय वन गेट वन ऑफरने नक्कीच कमाईमध्ये वाढ केली होती. परंतु केवळ या ऑफरमुळेच चित्रपट यशस्वी होत आहे असे म्हणता येणार नाही.

चित्रपटाची कथा आणि दोघंही कलाकारांचा अभिनय प्रक्षकांना खुप आवडला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाला टक्कर देणारा दुसरा कोणचताही हिट चित्रपट नसल्याचा फायदा देखील चित्रपटाला झाल्याचं दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com