चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्री झरीन खानने घेतला 'हा' निर्णय

zarin
zarin
Updated on

मुंबई - तब्बल दहा वर्षांपूर्वी सलमान खानच्या वीर चित्रपटाद्वारे झरीन खानने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यानंतर तिे हाऊसफुल्ल २, रेडी (विशेष भूमिका) , वीरप्पन असे काही चित्रपट केले खरे. परंतु तिला म्हणावे तसे स्टारडम प्राप्त झाले नाही. सलमानसारखा हिरोही तिला काही मदत करू शकला नाही. परंतु तरीही झरीनने आपली वाटचाल सुरूच ठेवली. हातात चांगले येतील असे प्रोजेक्ट तिने स्वीकारले. त्याबाबतीत तिला काही पुरस्कारही मिळाले पण ती काही त्याने हुरळून गेली नाही. आपले काम शांतपणे आणि मनमिळावूपणे ती करीत राहिली. त्यातच आताचा जमाना हा डिजिटलचा आहे आणि याची जाणीव सगळ्याच सेलिब्रेटींना आहे. त्यामुळे या डिजिटलद्वारे सतत चर्चेत राहणे...सतत फोकसमध्ये राहणे हे आलेच.

आपल्या चाहत्यांपर्यंत सातत्याने पोहोचता यावे याकरिता ही कलाकार मंडळी काही ना काही नवनवीन युक्ती शोधून काढत असतात. आलिया भट्ट, वरुण धवन, सलमान खान यांसारख्या बड्या कलाकारांनी तर स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. अन्य कुणी आपल्या चाहत्यांशी फेसबुकद्वारे संपर्क साधत आहे आणि या रेसमध्ये आपणही मागे पडायला नको असे आता झरीन खानला वाटत आहे. तशी झरीन खान आपले काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते आणि सतत चर्चेत राहात असते. आता तिने स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

New Video Alert on YOUTUBE. Link in bio. #ZareenKhan

A post shared by Z (@zareenkhan) on

या चॅनलच्यानिमित्ताने ती चाहत्यांना तिच्या आवडीनिवडी, ती खऱ्या आयुष्यात जोपासत असलेले छंद सारं काही सांगणार आहे. झरीन सांगते, मी खूप दिवसांपासून माझे स्वतःचे युट्यूब चॅनल सुरु करण्याचे प्लॅनिंग करत होते. पण काही तांत्रिक अडचणी येत होत्या. पण आता ते मी सुरु केले आहे. या चॅनलच्यानिमित्ताने मी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकने.` युट्यूब चॅनल सुरु करुन झरीनने तिच्या चाहत्यांना खूश खबर दिली आहे. 

zareen khan launches her youtube channel

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com