शोध संगीतसम्राटाचा! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. अनेकांना संगीत शिकण्याची आवड असते; पण योग्य संधी मिळत नाही.

भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. अनेकांना संगीत शिकण्याची आवड असते; पण योग्य संधी मिळत नाही. "झी युवा' या नवीन वाहिनीवर महाराष्ट्राच्या संगीतप्रेमींसाठी "संगीतसम्राट' हा एक नवीन संगीत रिऍलिटी शो लवकरच येत आहे. 
संगीत रिऍलिटी शो तसे येतच राहतात; पण या रिऍलिटी शोमध्ये असं वेगळं ते काय, असं तुम्ही विचाराल, तर हा रिऍलिटी शो आहे सगळ्याच अस्सल कलाकारांचा...

महाराष्ट्राच्या कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम याद्वारे देण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम केवळ गायकांसाठीच नाही, तर सर्व प्रकारच्या कलाकारांसाठी आहे. पण संगीताशी निगडीतच बरं का! जे कलाकार कोणत्याही वस्तूने किंवा अन्य प्रकारे श्रवणीय संगीत निर्माण करू शकतात अशांसाठी हा एक प्लॅटफॉर्म "झी युवा'ने तयार केला आहे. तोंडाने असेल, हाताने असेल किंवा ड्रम्सने; तुम्ही जर श्रवणीय संगीत सादर करू शकलात तर तुमची या शोमध्ये एन्ट्री झालीच म्हणून समजा.

या कार्यक्रमात तुम्ही एकटे किंवा साथीदारांसह सहभागी होऊ शकता. वयाची चार वर्षे पूर्ण केलेले कोणतेही कलाकार या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स 3 मेपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत सुरू होणार आहेत. यात चार वर्षांचे कलाकार चाळीस वर्षांच्या कलाकारांसोबत जुगलबंदी करताना दिसले तर आश्‍चर्य वाटू देऊ नका...! 
 

Web Title: zee yuva new show sangeet samrat