Zwigato trailer: Kapil Sharma plays frustrated delivery boy struggling with ratings and life
Zwigato trailer: Kapil Sharma plays frustrated delivery boy struggling with ratings and lifesakal

कपिल शर्मानं डिलिव्हरी बॉय बनून जिंकलं मन, Zwigato चा ट्रेलर बघाच..

कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर..

Zwigato trailer: 'डिलिव्हरी बॉय' ही आपल्या जीवनातील रोजची व्यक्ती झाली आहे. याच 'डिलिव्हरी बॉय' वर आधारित कपिल शर्मा (kapil sharma) चा "झ्विगाटो" हा चित्रपट येत आहे. 'झ्विगाटो' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आला आहे. हा ट्रेलर पाहून चाहते चांगलेच खुश झाले आहेत. या निमित्ताने कपिल 'डिलिव्हरी बॉय' होणं किती अवघड आहे, हे जगासमोर आणणार आहे. (Zwigato trailer: Kapil Sharma plays frustrated delivery boy struggling with ratings and life)

हा ट्रेलर, एका बिल्डिंगपासून सुरू होतो, जिथे कपिल हा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन येतो. पण अगदी सुरुवातीलाच एक सीन येतो, ज्यामध्ये डिलिव्हरी बॉयला इमारतीतील लिफ्ट वापरण्यास मनाई आहे असे लिहिलेले असते आणि त्यामुळे तो जिने वापरून वर जातो असे दाखवले जाते. डिलिव्हरी बॉयच्या समस्या या सीनमधून सांगण्यात आल्या आहेत.

यानंतर ट्रेलरमध्ये कपिल शर्माच्या कुटुंबाची झलकही दाखवण्यात आली आहे, ज्यांच्या गरजांसाठी कपिल रात्रंदिवस काम करत असतो. असाच एक सीन ट्रेलरमध्ये येतो, जिथे कपिलला कुटुंबाच्या गरजा भागवण मुश्किल होतं म्हणून त्याची पत्नी शहाना देखील कामावर जाण्याचा निर्णय घेते. परंतु त्यामुळे कुटुंबात वाद सुरू होतो. शिवाय डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यात किती अडचणी येतात हे देखील या ट्रेलर मध्ये दाखवले आहे.

या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये यशस्वी वर्ल्ड प्रीमिअरनंतर, झ्विगाटो आता बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये मन जिंकण्यासाठी सज्ज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com