#SakalForMaharashtra 'एकत्र येऊया..' उपक्रमात मान्यवरांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

"सकाळ"ने सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. राज्यातील तरूण शेतकऱ्यांना कृषिपूरक रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीवर असलेला अतिरिक्त ताण कमी होईल. व ग्रामीण महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मीतीला चालना मिळेल. त्यामुळे स्थलांतरांचा प्रश्न निर्माण होऊन शहरात होणाऱ्या गर्दीचाही प्रश्न मार्गी लागेल. सकाळच्या या उपक्रमात मी माझेही योगदान देतो.
- आंबादास चंदनशिवे, अवर सचिव मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन

"सकाळ सुरू करत असलेल्या चळवळीत योगदान देण्याची माझी तयारी असून माझ्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय कौशल्य विकासासाठी मी या पुढे महाविद्यालयात चर्चासत्र व मार्गदर्शन शिबीर आयोजन करेन या उपक्रमासंदर्भात सकाळचे अभिनंदन!
- मनोहर म्हात्रे, उपप्राचार्य, कळवा कॉलेज

स्वतःच्या पायावर उभे राहून नव्या व्यवसायासाठी प्रयत्न करणाऱ्या होतकरू तरुणांना कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांना व्यवसायासाठी, आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करेन. सकाळच्या चळवळीसाठी मी सहभाग घेणार आहे. या यशस्वी उपक्रमासाठी सकाळचे अभिनंदन! 
- अॅड. सुदर्शन साळवी, कळवा

सकाळ सुरू करत असलेल्या चळवळीला योगदान देण्यासाठी सेवासंघाच्या माध्यमातून व इतर सामाजिक एनजीओच्या मदतीने ग्रामीण भागातील व्यवसाय छोट्या कुटिरोद्योगासाठी लागणारे मार्गदर्शन व आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार आहे या चळवळीसाठी सकाळ समूहाचे मनःपुर्वक अभिनंदन!
- मोहन पाटील, समाजसेवक, ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal For Maharashtra people reaction and involvement