esakal | कोपर्डी प्रकरण ; सोमवारी लागणार घरोघरी दिवे!
sakal

बोलून बातमी शोधा

Kopardi Prakaran Maratha Kranti Morcha Aurangabad News

कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर अद्यापही कारवाई झालेली नाही. याच संदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली. १३ जुलैला कोपर्डी घटना घडली होती. हा दिवस समाज बलिदान दिन म्हणून साजरा करणार आहे.

कोपर्डी प्रकरण ; सोमवारी लागणार घरोघरी दिवे!

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाची सुरवात औरंगाबादेतून झाली. एवढेच नाही तर मराठा आरक्षणाच्या मागणीची सुरवातही ३० वर्षांपूर्वी येथूनच झाली. हा विषय समाजासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. आता हे आरक्षण वाचवणे ही जवाबदारी राज्य शासनाची आहे, भावना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शनिवारी (ता. ११) झालेल्या ऑनलाइन बैठकीत व्यक्त केली. तसेच सोमवारी (ता. १३) कोपर्डी प्रकरणातील ताईच्या स्मृतीदिनानिमित्त घरोघरी दिवा लावून समाजाने एकतेची ज्योत पेटवावी, असे आवाहनही केले. 

कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर अद्यापही कारवाई झालेली नाही. याच संदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली. १३ जुलैला कोपर्डी घटना घडली होती. हा दिवस समाज बलिदान दिन म्हणून साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने सोमवारी (ता. १३) सायंकाळी ७ वाजता एक दिवा, मेणबत्ती लावून कोपर्डी प्रकरणात बलिदान दिलेल्या ताईस अभिवादन करण्यात येणार आहे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गेल्या तीन दशकापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. न्यायपालिकेत अडकलेले आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी शासनाने यात लक्ष देऊन ते समाजाला मिळवून द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा- दिलासा... जनता कर्फ्यूतही चारशेहून अधिक कंपन्या राहणार सुरू   

बैठकीत आरक्षणाचे अभ्यासक किशोर चव्हाण, राजेंद्र दाते, चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, अभिजित देशमुख, शिवानंद भानुसे, सतीश वेताळ, विजय काकडे, सुकन्या भोसले, मनीषा मराठे, अकांत चव्हाण, मनोज गायके, रमेश गायकवाड, रेखा वहाटुळे, वैभव बोडखे, शिवाजी जगताप, प्रदीप हरदे, अजय गंडे, योगेश औताडे, सुभाष सूर्यवंशी, संजय जाधव, राजेश मेटे, रेणुका सोमवंशी, हितेश पाटील, विशाल वेताळ, विलास औताडे यांनी सहभाग घेतला. 

हेही वाचाबाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या  

बैठकीतील प्रमुख मुद्दे 

  • कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी द्या. 
  • आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना अद्यापही आर्थिक मदत पोचली नाही. ती तत्काळ द्यावी. 
  • ‘सारथी’बाबत सरकारने अधिक पारदर्शक भूमिका घेऊन ५०० कोटींची तरतूद करावी. 
  • आरक्षण टिकविण्यासाठीचे सर्व गोष्टी शासनाने कराव्यात.