esakal | औरंगाबाद महापालिकेची दिवाळी गोड, केंद्राकडून मिळाला पुन्हा ३१ कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

mahapalika news.jpg
  •  
  • केंद्र शासनाकडून मिळाला पुन्हा ३१ कोटींचा निधी 
  • महापालिकेची दिवाळी झाली गोड.  

औरंगाबाद महापालिकेची दिवाळी गोड, केंद्राकडून मिळाला पुन्हा ३१ कोटींचा निधी

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेच्या सुरू असलेल्या कामांसाठी केंद्र शासनाने शहरासाठी नुकताच ४९ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी १५ कोटी ७५ लाख तर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला. आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सुमारे ७०० कोटी रुपयांची कामे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने हाती घेतली आहेत. यातील ३०० ते ३५० कोटींची कामे सध्या सुरू आहेत. त्यात केंद्र शासनाने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनला ४९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यात राज्य शासनाच्या हिस्याचा निधी लवकरच मिळणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्य शासनाला ३९६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाले असून, औरंगाबाद महापालिकेसाठी १५ कोटी ७५ लाख रुपये राज्य शासनाने दिले आहेत. शहरातील कचऱ्याचा दोन वर्षांपूर्वी गंभीर बनला होता. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या १४८ कोटींच्या अनुदानातून महापालिकेने तीन ठिकाणी प्रत्येकी दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार तयार केला जाणार आहे. चिकलठाणा येथील प्रकल्प कार्यान्वित झाला आहे तर पडेगाव व कांचनवाडी येथील गॅस प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी १५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे कामांची गती वाढणार आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हवेचे प्रदूषण कमी होणार
शहरातील हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे केंद्र शासनाने हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी देशभरातील शहरांसाठी नुकताच निधी जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिकेला १६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)