औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग वेगात @११७३ पॉझिटिव्ह, आज वाढले ५४ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

औरंगाबादेत कोरोनाकंप सुरूच असून संसर्ग आटोक्यात अजूनही आलेला नाही. आज (गुरुवारी) एकूण ५४ रुग्ण बाधित झाले असून रुग्णसंख्या १ हजार १७३ झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासन आणि घाटी रुग्णालयाने दिली आहे.

औरंगाबाद: औरंगाबादेत कोरोनाकंप सुरूच असून संसर्ग आटोक्यात अजूनही आलेला नाही. आज (गुरुवारी) एकूण ५४ रुग्ण बाधित झाले असून रुग्णसंख्या १ हजार १७३ झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासन आणि घाटी रुग्णालयाने दिली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

औरंगाबाद शहरातील रुग्ण वाढ आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा असून मराठवाड्यातही रुग्ण वाढ होत असल्याने आता अधिक सजग आणि जबाबदारी घेण्याची गरज आहे. प्रशासनानेही ठोस उपाय नव्याने  राबविण्याची गरज आहे.

आज वाढले ५४ रुग्ण (कंसात बाधितांची संख्या )
गरम पाणी (१), शिवराज कॉलनी (१), कैलास नगर (१), सौदा कॉलनी (१), रेहमानिया कॉलनी (२), आझम कॉलनी, रोशन गेट (२), सिटी चौक (६), मकसूद कॉलनी (१), हडको एन-१२ (१), जयभीम नगर (११), हुसेन कॉलनी, गल्ली नं.९ (१), खडकेश्वर (१),  न्याय नगर, गल्ली न.१८ (२),  खिवंसरा पार्क,उल्कानगरी (२), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (२), मुकुंदवाडी (५), आदर्श कॉलनी (१), काबरा नगर (१), उस्मानपुरा (३), हुसेन कॉलनी, गल्ली नं.१० (४) आणि पडेगाव येथील मीरा नगर (४) व अन्य (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बुधवारी तीन जणांचा बळी
जयभीम नगर, टाउनहॉल येथील ५५ वर्षीय पुरुष आणि इंदिरानगर,  बायजीपुरा येथील ८० वर्षीय पुरुषाचा कोरोना आणि इतर आजारामुळे बुधवारी (ता. २०) मृत्यू झाला. तसेच रहेमानिया कॉलनीतील एका रुग्णाचा काल मृत्यू झाला.  आतापर्यंत शहरात एकूण ३९ मृत्यू झाले आहेत.

असा आहे कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण - ४५१
एकूण मृत्यू   - ३९
उपचार घेणारे रुग्ण - ६५३
एकूण रुग्णसंख्या  -११७३

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty Four CoronaVirus Positive Patient Found Aurangabad News