दिलासादायक : आजीनंतर सातवर्षीय नात कोरोनामुक्त

प्रकाश बनकर
Saturday, 18 April 2020

३ एप्रिल रोजी या चिमुकलीला कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने धूत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्याबरोबर तिची आई, वडील, मोठी बहीण यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

औरंगाबाद :  सिडको एन-चार येथील ५८ वर्षीय महिलेमुळे तिच्या सातवर्षीय नातीला कोरोनाची लागण झाली होती. त्या चिमुकलीवर धूत हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. शनिवारी (ता.१८) ही चिमुकली कोरोनामुक्त झाली असून, तिला सुटी देण्यात आली आहे, अशी माहिती हॉस्पिटलतर्फे देण्यात आली. 

तीन एप्रिल रोजी या चिमुकलीला कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्याने धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्याबरोबर तिची आई, वडील, मोठी बहीण यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. चार एप्रिल रोजी सदरील मुलीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. रेणू बोराळकर, चेस्ट फिजिशियन तज्ज्ञ डॉ.वरुण गवळी यांच्या देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवून तिच्यावर उपचार करण्यात आले. 
.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

विलगीकरण काळात त्या मुलीच्या उपचारानंतर तीन स्वॅब फेरतपासणीसाठी पाठवण्यात आले. हे तिन्ही अहवाल निगेटिव्ह आले. शनिवारी (ता.१८) तिचा १४ व १५ व्या दिवशीचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे रुग्णालयातून तिला सुटी देण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियांमध्ये महापालिका आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचेही धूत हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा    

आजीनंतर नात घरी परतली चिमुकलीची ५८ वर्षिय आजीला कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांना मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावरील उपचारनंतर त्या कोरोनामुक्त झाल्या. आज त्यांची नातही कोरोनामुक्त होऊन घरी परतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven year old Girl Coronas free Auranagabad News