Good news : औरंगाबादमध्ये ३५ जण झाले कोरोनामुक्त

22 Covid 19 Patients Recovered in Aurangabad
22 Covid 19 Patients Recovered in Aurangabad

औरंगाबाद  : चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथून २२ ‘कोविड-१९’ बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर ते शनिवारी (ता. नऊ) कोविडमुक्त झाले, तर महापालिकेच्या किल्लेअर्क येथील क्वारंटाईन कक्षातील १३ जण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसभरातून शहरातून एकूण ३५ जण कोविड-१९ या आजारातून बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६५ कोविड रुग्ण बरे होऊन घरी परतले. दरम्यान, दिवसभरात नव्याने ३० रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५०८ झाली. गंगापूरमध्ये एक रुग्ण आढळला. 

शनिवारी शहरातील वाढलेल्या कोरोनाबाधितांमध्ये (कंसात रुग्णसंख्या) संजयनगर, मुकुंदवाडी (६), कटकट गेट (२), बाबर कॉलनी (४), आसेफिया कॉलनी (१), सिल्क मिल कॉलनी (१), रामनगर-मुकुंदवाडी (१), भवानीनगर, जुना मोंढा (२) सातारा परिसर (१) पानचक्की (१) आणि जुना बाजार (१), पुंडलिकनगर (९) आणि गंगापूर (१) या परिसरातील रुग्ण आहेत. यामध्ये १५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. कोरोनाबाधित ५०८ रुग्णांमध्ये ३११ पुरुष, १९७ महिला आहेत. 

मिनी झाले कोरोनामुक्त 
कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये बागवान मशीद (५), नूर कॉलनी (६), किलेअर्क (३), भीमनगर (१), चेलीपुरा (१), छोटीमंडी, दौलताबाद (१), समतानगर (२), बडा टाकिया मशीद (१), सातारा परिसर (१), जलाल कॉलनी (१) या परिसरातील व्यक्तींचा समावेश असल्याचे रुग्णालयाने कळवले आहे. 
 
किल्लेअर्क येथील कोरोनामुक्त 
महापालिकेतर्फे कोरोनाबाधित पण सौम्य लक्षण असलेल्या १८ ते ४५ वयोगटातील तरुणांवर किल्लेअर्क येथील क्वारंटाईन कक्षातील उपचार केले जात आहेत. त्यातील १३ जण बरे झाल्यानंतर शनिवारी त्यांना सुटी देण्यात आली. 

घाटीत ४२ कोविड रुग्णांवर उपचार 
घाटीच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये (डीसीएच) ४२ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३९ रुग्णांची स्थिती सामान्य, तर तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. ३८ कोविड निगेटिव्ह रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. २३ कोविड निगेटिव्ह बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. 

४३ रुग्णांचे स्क्रीनिंग झाले 
घाटीमध्ये शहरातील सिल्क मिल कॉलनीतील ६० वर्षीय महिला, मकसूद कॉलनी, सिकंदर पार्क येथील ३७ वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील रामनगरच्या ८० वर्षीय पुरुष, किलेअर्कमधील ३५ वर्षीय महिला, जुना बाजारातील ७५ वर्षीय पुरुष आणि आणि गंगापुरातील फुलशेवडा जिल्हा परिषद शाळा येथील ७६ वर्षीय पुरुष या रुग्णांचाही कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला; तसेच पुंडलिकनगर येथील ५८ वर्षीय महिला रुग्णास घाटीतून मिनी घाटीत शुक्रवारी (ता. आठ) संदर्भित करण्यात आले. शुक्रवारी दुपारी चारपर्यंत ४३ रुग्णांचे स्क्रीनिंग झाले. १८ रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. ९७ रुग्ण भरती असल्याचे डॉ. येळीकर, माध्यम समन्वयक डॉ.अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे. 
 
आता रोबोट करणार मदत 
वाळूजच्या रुचा इंजिनिअर्स प्रा.लि कंपनीकडून घाटीतील कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक असा रोबोट भेट देण्यात आला. औषध पुरविणे, कक्षामधील सॅनिटायझेशन करणे, रुग्णांच्या खाटापर्यंत सेवा देण्याचे काम या रोबोटकडून होऊ शकते, असे मत डॉ. येळीकर यांनी व्यक्त करीत या कंपनीचे आभार मानले. 

कोरोना मीटर 

  • उपचार घेत असलेले रुग्ण : ४३१ 
  • बरे झालेले रुग्ण  : ६५ 
  • मृत्यू झालेले रुग्ण : १२ 
  • एकूण : ५०८ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com