Coronavirus Updates : औरंगाबादेत आणखी तीन बळी, दिवसभरात नवे ३२ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

शहरात एकूण रुग्णसंख्या १ हजार २१८ झाली आहे. आजपर्यंत एकूण ५७० जण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासन आणि घाटी रुग्णालयाने दिली. 

औरंगाबाद : शहरात आणखी तिघांचा शुक्रवारी (ता. २२) कोरोना आणि इतर आजाराने बळी गेला. आता बळींची संख्या तब्बल ४५ वर गेली. शुक्रवारी (ता. २२) नवीन ३२
कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिलासादायक म्हणजे सरासरीपेक्षा शुक्रवारी बाधितांची संख्या थोडी कमी आली आहे. आता शहरात एकूण रुग्णसंख्या १ हजार २१८ झाली आहे. आजपर्यंत एकूण ५७० जण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासन आणि घाटी रुग्णालयाने दिली. 
  
४३ वा मृत्यू 
संजयनगर, मुकुंदवाडी येथील ४१ वर्ष महिलेला १६ मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. लक्षणावरून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. १९ मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर डेडिकेटेड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, २१ मे रोजी दुपारी एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. बायलॅटरल न्यूमोनिया विथ अॅक्युट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ड्युटू कोविड -१९, इन नोन केस ऑफ हाइपरटेन्शन, डायबेटीस, मेलिटिस  हायपोथायरॉईडीझम हे त्यांच्या मृत्यूचे कारण आहे. 
  
४४ वा मृत्यू 
बहादुरपुरा येथील ७० वर्षीय महिलेला १४ मे रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लक्षणावरून त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यांना कोविड-१९ ची लागण झाल्याचे अहवालावरून १५ मे रोजी स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, २२ मे रोजी सकाळी सव्वा तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. बायलॅटरल न्यूमोनिया विथ अॅक्युट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ड्युटू कोविड -१९ विथ सेरेब्रो व्हस्क्युलार एक्सीडेंट इन अ नोन केस ऑफ लिफ्ट हेमीपेरेसिस विथ डायबेटीस, मेलिटिस विथ हाइपरटेन्शन विथ हायपोथायरॉईडीझम हे त्यांच्या मृत्यूचे कारण आहे. 

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 
  
४५ वा मृत्यू 
बाजीपुरा येथील ६१ वर्षीय रुग्णाला दम लागत असल्याने १६ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घाटीच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लक्षणावरून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाणही ८४ टक्के होते. प्रकृती खालावल्याने त्यांना १७ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अतिदक्षता विभागात भरती केले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शर्तीचे उपचार करूनही त्यांचा २२ मे रोजी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह हा आजार होता. 
  
या भागात सापडले नवे रुग्ण (कंसात बाधितांची संख्या) 
जयभीमनगर (५), गरामपाणी (२), रहेमानिया कॉलनी (२), कुवारफल्ली, राजाबाजार (१), सुराणानगर, भालचंद्र एपिटी (१), मिलकॉर्नर, पोलिस कॉलनी (१), न्यायनगर, गल्ली क्रमांक सात (२), भवानीनगर, जुना मोंढा, गल्ली क्रमांक पाच (२), रहीमनगर, लेन क्रमांक चार, जसवंतपुरा (१), पुंडलिकनगर, गल्ली क्रमांक दहा (१), सातारा परिसर (१), जवाहर कॉलनी (१), न्यायनगर (२), टाइम्स कॉलनी, कटकटगेट (४), कटकट गेट (१), सिडको एन -२, ठाकरेनगर (१), शिवाजीनगर (१), रवींद्रनगर शहाबाजार (१), कैलासनगर (१), रोशनगेट (१) या भागातील हे नवे बाधित रुग्ण आहेत. १८ पुरुष आणि १४ महिलांचा यात समावेश आहे. तर आठ वर्षीय दोन मुलं आणि ७९ आणि ७० वर्षीय महिला आणि एक ७० वर्षीय पुरुष असे सर्वांत जास्त आणि कमी वयीन रुग्ण आज बाधित झालेल्यांपैकी आहेत. 
  
आकडे बोलतात... (कोरोना मीटर ) 

  • उपचार - ६०३ 
  • बरे झालेले - ५७० 
  • मृत्यू -४५ 

 
एकूण रुग्ण - १,२१८ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 new COVID-19 patients in Aurangabad