Coronavirus : औरंगाबादेत ५७ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू, कन्नडमध्ये दोघांना बाधा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 958 झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  दरम्यान, कन्नड तालुक्यातील देवळाणा येथे दोघांना कोविड-१९ ची बाधा झाली.  

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (ता. 17) सकाळी 57 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 958 झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  दरम्यान, कन्नड तालुक्यातील देवळाणा येथे दोघांना कोविड-१९ ची बाधा झाली.  

32 वर्षीय तरुणाचा मृत्यू

जलाल कॉलनी येथील 32 वर्षीय तरुणाचा शनिवारी (ता. 16) रात्री 9 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 15) या युवकास अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या स्वॅबचा अहवाल घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह निघाला.

पोलिस शिपाई कोरोनामुक्त
किलेअर्क येथील रहिवासी तथा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या शिपायास सात मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. या कर्मचार्‍यास उपचारासाठी धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर हा पोलिस शिपाई शनिवारी (ता. 16) कोरोनामुक्त झाला. त्यास सुटी देण्यात आली. या शिपायावर नातेवाईकांनी घरी आल्यावर पुष्पांचा वर्षाव करून स्वागत केले.

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

19 जणांना रुग्णालयात सुटी
एकीकडे कोरोना कहर असताना दुसरीकडे शनिवारी 19 जणांना उपचारानतंर सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत रुग्णालयात सुटी झालेल्यांची संख्या ही 326 वर पोचली आहे. यात पुंडलिकनगर -3 (पुरुष), दत्तनगर-1 (पुरुष), संजयनगर- 1 (महिला), जयभीमनगर-7 (दोन पुरुष, पाच महिला), कबाडीपुरा-5 (दोन पुरुष, तीन महिला), सावित्रीनगर चिकलठाणा- 1, (महिला), भडकल गेट- 1,  (पुरुष) यांचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्ण -

 • जालान नगर (1)
 • उलकानगरी (1)
 • रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1)
 • संजयनगर (1)
 • सातारा परिसर (1)
 • गणपती बाग, सातारा परिसर (6)
 • विद्यानगर, सेव्हन हिल (1) 
 • एन सहा,सिडको (1)
 • पुंडलिकनगर (5)
 • हुसेन कॉलनी (8)
 • राम नगर (3)
 • बहादूरपुरा (8)
 • बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1)
 • कबाडीपुरा, बुड्डीलेन (3)
 • शरिफ कॉलनी (3)
 • बाबर कॉलनी (3)
 • सिंधी कॉलनी (1)
 • न्याय नगर (1)
 • न्याय नगर दुर्गा माता कॉलनी (1)
 • सिल्क मिल कॉलनी  (1)
 • घाटी (1)
 • रेंटीपुरा (1)
 • अन्य (2)   
 • कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) 

 
कोरोना मीटर 

 • उपचार घेणार- 605
 • बरे झालेले - 326
 • मृत्यू झालेले - 27

एकूण- 958


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 57 People test Positive for COVID-19 Aurangabad