Covid-19 : आता मंगल कार्यालयेही होणार रुग्णालये, प्रशासन तयारीला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

आस्तिककुमार पांडेय : प्रत्येक बाधिताला पूर्णपणे बरे करण्यासाठी सर्वांचे परिश्रम 

औरंगाबाद : शहरात कोरोनाच कहर वाढतच आहे. त्यामुळे सुमारे पाच हजार रुग्णांवर उपचार करता येईल, एवढी तयारी करून ठेवल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. दरम्यान, त्यापुढे जाऊन प्रशासनाने मंगल कार्यालयांचीही चाचपणी सुरू केली आहे. अनेकांसोबत बोलणे झाले आहे. यासाठी काही मंगल कार्यालयांना ताब्यात
घेण्याची तयारीही केलेली आहे. 

शहरात सुरवातीला कोरोनाबाधित एक-दोन रुग्णच आढळून आहे. त्यानंतर अनपेक्षितपणे आकडा एवढा वाढला की, काही दिवसांतच रुग्णांची संख्या एक हजारावर जाईल. यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. मात्र, वाढत्या संख्येमुळे शासकीय यंत्रणा तोकडी पडत असून, आपल्याला कोरोना झाला तर उपचार मिळतील का? असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. त्यावर आस्तिककुमार पांडेय म्हणाले, की प्रत्येक रुग्णाला बरे करण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत आहे.

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

रूग्ण बरेही होत आहेत. मात्र आगामी काळात परिस्थिती अधिकच गंभीर झाली तर उपाय म्हणून सुमारे पाच हजार रुग्णांवर उपचार करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या सहा कोविड केअर सेंटरमध्ये चार हजार रुग्णांवर उपचार करता येतील, एवढी तयारी आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४५०, जिल्हा सामान्य रूग्णालयात १५० बेडची व्यवस्था आहेत. महिनाभरात २५० बेडचे रूग्णालय चिकलठाणा एमआयडीसीतील एका इमारतीत उभे केले जाणार आहे. एमजीएम रुग्णालयानेदेखील ५०० बेडची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली आहे. 

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

एमजीएमध्ये ‘जीवनदायी’तून उपचार 
एमजीएम रुग्णालयाला महापालिकेतर्फे पीपीई कीट, मास्कचा पुरवठा केला जाणार आहे. त्यानुसार याठिकणी ५०० रुग्णांची व्यवस्था केली जाईल. येथे महात्मा जोतिबा फुले आरोग्यदायी (जीवनदायी) योजनेतून मोफत उपचार केले जातील, असे आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. 

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे
  
मंगल कार्यालये होतील रुग्णालये 
सध्या पाच हजार रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापुढे जाऊन प्रशासनाने मंगल कार्यालयांचीही चाचपणी सुरू केली आहे. अनेकांसोबत बोलणे झाले आहे. यासाठी काही मंगल कार्यालयांना ताब्यात घेण्याची तयारीही केलेली आहे. 

कुठे किती व्यवस्था? 
 

  • महापालिकेचे सहा कोविड सेंटर- ४, ००० 
  • घाटी रुग्णालय-४५० 
  • जिल्हा सामान्य रुग्णालय-१५० 
  • चिकलठाणा एमआयडीसी रुग्णालय-२५० 
  • एमजीएम रुग्णालय-५०० 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5K Patients will be Treated at Same Time