अरे बाप रे...! नदीच्या पात्रात अडकल्या ७० शेळ्या... पुढे झाले असे की... 

दिनेश शिंदे  
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

सुखना नदीपात्रात पिंप्रीराजा येथील शेळीपालक शेतकरी संतोष पंडित चांगुलपाये यांच्या सत्तर शेळ्या सुकना धरणाच्या प्रवाहाच्या सांडव्याच्या खाली अडकल्या. 

चित्ते पिपंळगाव (औरंगाबाद) : गारखेडा ता.औरंगाबाद येथील सुखना मध्यम प्रकल्प शुक्रवारी रात्री  झालेल्या जोरदार पावसामुळे शंभर टक्के भरला. परिणामी मध्यम प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून मोठ्या प्रवाहाने वाहु लागले आहे. सुखना नदीपात्रात पिंप्रीराजा येथील शेळीपालक शेतकरी संतोष पंडित चांगुलपाये यांच्या सत्तर शेळ्या सुकना धरणाच्या प्रवाहाच्या सांडव्याच्या खाली अडकल्या. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

ही बाब लक्षात आल्यावर संतोष चांगुलपाये आणि गावकर्यांनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधला.  अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. आणि तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ७० शेळ्यांना  बाहेर काढले.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 
यावेळी अग्निशमन पथकाचे कर्मचारी  आर. के. सुरे, एल. एम. गायकवाड, एच. वाय. घुगे,  सचिन शिंदे, सुजीत कल्याणकर, शशिकांत गित्ते, अमोल चौधरी, राहुल गायकवाड, सुभाष दुधे यांनी परिश्रम घेतले.  

Edited BY Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 goats trapped in Sukhana river water