esakal | कोरोनात उच्च रक्तदाब, मधुमेहाचेच ७६ बळी
sakal

बोलून बातमी शोधा

deatha

उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या ७६ कोरोना रुग्ण आत्तापर्यंत मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॅपव्दारे जास्तीत जास्त ५० वर्षावरील नागरिकांची नोंदणी करून त्यांना तातडीने उपचार देण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे.

कोरोनात उच्च रक्तदाब, मधुमेहाचेच ७६ बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे शहरातील बळींचा आकडा झपाट्याने वाढत आहे. ज्यांना जुने आजार व सोबत उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, किडणी, फुफुसाचे आजार असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या ७६ कोरोना रुग्ण आत्तापर्यंत मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॅपव्दारे जास्तीत जास्त ५० वर्षावरील नागरिकांची नोंदणी करून त्यांना तातडीने उपचार देण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे.

कोरोनाबाधित १२८ जणांचा शुक्रवार (ता. १२) सकाळपर्यंत मृत्यू झाला होता. राज्याचा विचार करता औरंगाबाद शहराचा मृत्यूदर सर्वाधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्रीय पथकाने महापालिकेला सूचना केल्या आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये ५० वर्षावरील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे अशा नागरिकांचा शिक्षकांमार्फत सर्व्हे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॅपव्दारे नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास आहे का? याच्या नोंदी घेत आहेत. अॅपव्दारे ही माहिती कंट्रोल रूमच्या कर्मचाऱ्यांना प्राप्त होताच तेथील कर्मचारी पाठपुरावा करत, ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांची माहिती डॉक्टरांना कळविली जात आहे. दोन दिवसांपर्यंत १३ हजार जणांची नोंदणी या अॅपवर आली होती. त्यातील ६०२ जण रेडझोनमध्ये आढळून आले होते.

दुसरीकडे सुरवातीच्या १०० जणांच्या मृत्यूचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने आढावा घेतल असता मृत्यू पावलेल्यांमध्ये ७६ जणांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याचे समोर आले आहे. इतरांना फुफुसाचे आजार, किडणी आजार, ह्रदयाशी संबंधित आजार, हायपो थॉईराईड, प्रतिकार शक्ती कमी असणे असे आजार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

मृत्यू झालेल्यांमध्ये आजाराचे प्रमाण 
उच्च रक्तदाब-३९ 
मधुमेह-३७ 
फुफुसाचे आजार-७ 
किडणी आजार-३ 
ह्रदयरोग-११ 
हायपो थॉईराईड-८ 
प्रतिकारशक्ती कमी असणे-८ 
इतर आजार-३