Coronavirus LIVE : औरंगाबाद नऊशे पार, १९ जणांना सुटी, महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

राहुलनगर येथील साठ वर्षीय बाधित महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात एकूण बधितांचा आकडा ९०१ वर पोचला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

औरंगाबाद  : शहरात कोरोनाच्या रुग्णवाढीचे मीटर वाढतच आहे. शुक्रवारी (ता. १५) दिवसभरात ९३ रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर शनिवारी (ता. १६) सकाळी ३० तर दुपारी २९ असे दिवसभरात ५९ रुग्णांची भर पडली; तर १९ जण कोविडमुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राहुलनगर येथील साठ वर्षीय बाधित महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात एकूण बधितांचा आकडा ९०१ वर पोचला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

शहरात आठ मे रोजी शंभर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. शुक्रवारी (ता.१५) दिवसभरात ९३ रुग्ण वाढले, तर चौघाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी एमजीएम मेडिकल कॉलेज तीन, हनुमान चौक, चिकलठाणा एक, रामनगर तीन, एमआयडीसी एक,जालाननगर एक, संजयनगर गल्ली क्रमांक सहामध्ये तीन, सादानगर चार, किराडपुरा एक, बजाजनगर एक, जिन्सी रामनासपुरा एक, जुना मोंढा, भवानीनगर, गल्ली क्रमांक पाच एक, जहागीरदार कॉलनी एक, आदर्श कॉलनी एक, रोशनगेट एक, शंभूनगर सात असे ३० रुग्ण वाढले. त्यानंतर दुपारी चारनंतर २८ नव्या रुग्णांची भर पडली. 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

दुपारी सिटी चौक एक, कैलासनगर एक, चाऊस कॉलनी एक, मकसूद कॉलनी दोन, हुसेन कॉलनी चार, जाधववाडी एक, न्यू बायजीपुरा, गल्ली क्रमांक तीनमध्ये १, एन सहा, संभाजी कॉलनी एक, कटकट गेट एक, बायजीपुरा दहा, अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको दोन, लेबर कॉलनी एक, जटवाडा एक राहुलनगर एक आणि जलाल कॉलनी एक या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये दिवसभरात एकूण ५९ जण बाधित आहे. यात ३३ पुरुष आणि २६ महिला रुग्णांचा समावेश आहे. 

१९ जणांना रुग्णालयात सुटी 
एकीकडे कोरोना कहर पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे शनिवारी १९ जणांना उपचारानतंर सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत रुग्णालयात सुटी झालेल्याची संख्या ही ३२६ वर पोचली आहे. यात पुंडलिकनगरमधील तीन (पुरुष), दत्तनगरातील एक (पुरुष), संजयनगरातील एक (महिला), जयभीमनगरातील सात (दोन पुरुष, पाच महिला), कबाडीपुरा पाच (दोन पुरुष, तीन महिला), सावित्रीनगर चिकलठाणा येथील एक (महिला), भडकल गेट एक (पुरुष) यांचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे
 
६० वर्षीय महिलेचा मृत्यू 
राहुलनगर येथील ६० वर्षीय महिलेलाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता या महिलेला घाटी रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत दाखल करण्यात आले होते. त्यांचा बायलॅट्र न्युमोनायटीस डयू टू कोविड-१९ इन केस ऑफ डायबेटीस मेलिटन टाईप-२ या कारणाने मृत्यू झाला. त्यांचा स्वॅबचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मीडिया समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 
 
कोरोना मीटर 

  • उपचार घेणार - ५४९ 
  • बरे झालेले - ३२६ 
  • मृत्यू झालेले - २६ 

एकूण- ९०१ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 901 Cases Of COVID-19 in Aurangabad