'आप' ची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार. म्हणाले फसवणुकीचा गु्न्हा दाखल करा  

अनिलकुमार जमधडे
Friday, 2 October 2020

शिवसेनेने स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पाळले नाही, औरंगाबाद आप च्या वतीने  

औरंगाबाद  : शिवसेनेतर्फे निवडणुकीपूर्वी स्वस्त वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वचन पाळले नाही, त्यामुळे आम आदमी पार्टीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वीज ग्राहकांना ३०० युनिट वीज वापर केल्यास ३० टक्के स्वस्त वीज देण्याचे वचन दिले होते. मात्र हे वचन न पाळता उलट २० टक्के दर वाढ करून राज्यातील जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. देशात आणि राज्यात महामारीचे संकट असताना १ एप्रिल २०२० पासून जवळपास २० टक्के वीज दर वाढ करून ३ रुपये प्रति युनिट तयार होणारी विज १५ रुपये दराने वसुली करण्यात येत आहे. ही कृती एकूणच राज्यातील जनतेसोबत धोका देणारी आहे. या प्रश्नासाठी आम आदमी पार्टीतर्फे वारंवार आंदोलने करुन निवेदने देण्यात आले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यामुळे महावितरण व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कलम ४२० प्रमाणे फौजदारी कारवाई करावी या मागणीचे निवेदन सिटीचौक, पुंडलीकनगर आणि सिडको पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रघुनाथदादा पाटील, सदाशिव पाटील, अंकुशराव आगे, माजाज खान, रवींद्र पाटील, सुदर्शन बारवाल, रवींद्र भैया, प्रशांत जेऊरकर, वैजनाथ राठोड, कैलास बनसोडे, सतीश संचेती, यांची उपस्थिती होती.

 देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP complain against CM Aurangabad news