esakal | या पठ्ठ्याने व्याजाने कार घेतली अन् बनावट कागदपत्राद्वारे विकली आता...
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

व्याजावर घेतलेल्या कारचे हप्ते न फेडता बनावट कागदपत्रांधारे कारची विक्री करुन बॅंकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी शुक्रवारी (ता.१९) दिले. संजय भिकाजी साळवे (रा. बाजीराव पेशवे नगर, सातारा परिसर) असे त्या आरोपीचे नाव आहे.

या पठ्ठ्याने व्याजाने कार घेतली अन् बनावट कागदपत्राद्वारे विकली आता...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: व्याजावर घेतलेल्या कारचे हप्ते न फेडता बनावट कागदपत्रांधारे कारची विक्री करुन बॅंकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी शुक्रवारी (ता.१९) दिले. संजय भिकाजी साळवे (रा. बाजीराव पेशवे नगर, सातारा परिसर) असे त्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

प्रकरणात पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बॅंक लि. ची सातारा येथील शाखेचे कर्ज विभाग प्रमुख सुधाकर जिजाराव शिंदे (५२, रा. राजेश नगर, बीड बायपास) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, बॅंकेने आरोपीला कार घेण्यासाठी २५ एप्रिल २०१५ रोजी ११ लाख ८९ हजार ३० रुपयांचे कर्ज शेकडा १५ टक्के व्याज दराने ६० महिन्यांसाठी दरमहा २७ हजार ९७ रुपये मासिक हप्त्याने प्रमाणे परत फेडीच्या अटीवर दिले होते.

आरोपीने २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत एक लाख रुपयांचा कर्ज भरणा केली. त्यानंतर आरोपीने कर्ज न भरल्याने बॅंकेने त्याला लेखी व तोंडी सुचना देखील केल्या, मात्र आरोपीने कर्जाची परतफेड केली नाही. दरम्यान आरोपीने कर्जावर घेतलेली कार (क्रं. एमएच२० डीजे ५८४७) बॅंकेच्या संमतीशिवाय बनावट कागदपत्र तयार करुन बॅंकेचे कर्ज नोंदीचे तारण बोजा नोंद काढून टाकण्यासाठी ते आरटीओ कार्यालयात दाखल केले.

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

आरटीओ कार्यालयाने पडताळणीसाठी बॅंकेला पत्र पाठविले तेंव्हा ही बाब समोर आली. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी संजय साळवे याला १७ जून रोजी अटक केली. तर न्यायालयाने त्याला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी दरम्यान आरोपीने पैशांची अडचण असल्याने सदरील कार नामदेव गायकवाड याच्या मध्यस्थीने मुकेश वासनीक (रा. मालीपार, जि. भंडारा) दोन लाख २० हजारांना विकल्याचे सांगितले.

कोठडीची मुदतसंपल्याने आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीने विक्री केलेल्या कारचा शोध घेणे आहे. गुन्ह्यात वापरलेले बॅंकेचे कागदपत्र व खोटे स्टॅम्प कोठे तयार केले याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याबाबत देखील तपास करणे असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे यांनी न्यायालयाकडे केली.

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?