उद्धवजींच्या कामाची आम्ही तारीफ करत होतो, पण आता सगळं वाया गेलं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

जिल्ह्यात दारुविक्रीची दुकानं उघडण्यास खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आणि त्यांच्या ट्विटवरून चांगलीच खडाखडी सुरू झाली. ‘रेड झोन’ असतानाही जर दारुची दुकानं उघडली, तर लॉकडाऊन तोडून ती बंद करायला भाग पाडू, महिलांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करु, असं इम्तियाज जलील म्हणाले होते. यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी टीका केली आहे.

औरंगाबाद : उद्धवजींच्या कामाची आम्हीही तारीफ करत होतो. पण आता सगळं वाया गेलं, असं म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दारूची दुकानं सुरू करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. रेड झोनमध्येही दारूची दुकानं चालू केली जात असतील, तर लिकर लॉबीच्या हातून मोठा पैसा एक्स्चेंज झाला असला पाहिजे, असं म्हणत त्यांनी ट्विटरवर निषेधाची राळ उडवून दिली आहे. 

''रेडझोनमधले आमदार, खासदार या मृत्यूच्या खेळाला परवानगी कशी देऊ शकतात? कदाचित तेही 'बेवडे'च असले पाहिजेत,'' अशा कठोर शब्दांत त्यांनी ट्विट केले आहेत. दारूच्या दुकानाबाहेर रांगा लावणाऱ्यांची रेशन कार्डे जप्त करा, अशी सरकारला विनंती करतो. त्यांना सरकारी रेशनची गरज नाही. जर ते दारू खरेदी करू शकत असतील, तर ते अन्नही विकत घेऊ शकतात. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाची लाज वाटते, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. 

महापालिका संकटात, आयुक्तांनी घेतली २१ लाखांची कार

जिल्ह्यात दारुविक्रीची दुकानं उघडण्यास खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आणि त्यांच्या ट्विटवरून चांगलीच खडाखडी सुरू झाली. ‘रेड झोन’ असतानाही जर दारुची दुकानं उघडली, तर लॉकडाऊन तोडून ती बंद करायला भाग पाडू, महिलांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करु, असं इम्तियाज जलील म्हणाले होते. यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी टीका केली आहे.

‘सरकारनं रेड झोनमध्येही दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जर औरंगाबादमधली मद्यविक्रीची दुकानं उघडली गेली, तर आम्ही लॉकडाऊनचे सर्व नियम तोडू आणि ही दुकानं जबरदस्तीनं बंद करायला भाग पाडू. आम्ही बर्‍याच महिलांना रस्त्यावर येण्यास सांगू. दारु विक्री करुन आपल्या आई-बहिणींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही,’ असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटर संदेशाद्वारे दिला होता. 

परभणीतून फोन आला आणि औरंगाबादेत घडले काय...  

दारूची ही दुकानं महिलांसाठी मोठी समस्या आहे, त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. माझ्या मोलकरणीचा नवरा दारुच्या नशेत घरी आल्यावर रोज तिला मारहाण करतो. या कठीण काळात दारु विकण्याची इतकी घाई का आहे? असंच असेल, तर सगळीच दुकाने सुरु करा, केवळ दारुच्या दुकानांनाच विशेष सूट का, असा सवालही इम्तियाज जलील यांनी केला होता. 

भाजप खासदार म्हणाले, शोभतं का?

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका तर केलीच, पण लॉकडाऊनचे नियम तोडण्याची भाषा खासदाराला शोभते का, असा सवालही केला आहे. अशी चिथावणीखोर भाषा वापरणाऱ्या खासदारांवर पोलिस आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. लॉकडाऊनचे नियम मोडून महिलांना रस्त्यावर उतरवू असे म्हणणे म्हणजे पोलिस यंत्रणेवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIMIM Imtiyaz Jaleel Attacked On Maharashtra Government On The Liquor Shops Issue