CoronaVirus : चोरपावलांनी विकली जातेय दारू! 

प्रकाश बनकर
Tuesday, 5 May 2020

कन्नड, सिल्लोडच्या ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने विक्री सुरूच 

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. कोरोनाचा हा विळखा कमी करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस दल रात्रंदिवस कार्यरत आहे. प्रशासनातर्फे संचारबंदी कठोर करण्यात येत आहे. असे असताना शहर व जिल्ह्यात दारू विक्री परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने दारू विक्री होत आहे. 

लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता मद्यविक्री, बार, हॉटेल, मॉल्स; तसेच सर्व गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. या तिसऱ्या लॉकडाउनमध्ये राज्यातील ‘ग्रीन’, ‘ऑरेंज’, ‘रेड झोन’ मधील दारूची दुकाने सुरू ठेवायचा, असा आदेश राज्य सरकारतर्फे काढण्यात आला आहे. असे असले, तरी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे शहर व जिल्ह्यात दारूविक्री बंद राहणार असल्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यासह खासदार इम्तियाज जलील यांनीही दारूची दुकाने सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

छुप्या पद्धतीने दारूविक्री

बंदच्या काळात ग्रामीणमध्ये मात्र दारूचा दारूची विक्री नियमितपणे सुरू आहे. ग्रामीणमधील प्रत्येक गावात छुप्या पद्धतीने दारूविक्री होत आहे. 
ग्रामीणमध्ये अडीच हजारांना मिळणारे दारूचे बॉक्स पाच ते सहा हजारांत विक्री करण्यात येत आहेत. अनेकजण छुप्या पद्धतीने हा दारूचा व्यवसाय करीत आहेत. परवानाधारक दारू विक्रेत्यांकडून ही दारू मिळवून विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तिप्पट दरात विक्री 

परवानाधारक दारू विक्रेत्याकडे असलेला स्टॉक दुप्पट ते तिप्पट भावात विक्री सुरू आहे. यात कन्नड, सिल्लोड तालुका आघाडीवर आहे. सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांत हे प्रकार सुरू आहेत. परवानाधारक दारू विक्रेत्यांकडून हे दारू बॉक्स विकत घेऊन काही लोक दारू विक्रीचा व्यवसायही करू लागले आहेत. गेल्या महिन्यात अजिंठा पोलिसांनी अंभई (ता. सिल्लोड) या गावातील दारू पकडली होती. त्यानंतर या गावात पुन्हा दारू विक्री सुरू झाली आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

बनावट दारू पिताच रिॲक्शन 

नामी संधी साधत काही लोकांनी बनावट दारू विक्री सुरू केली आहे. औरंगाबाद येथील एका व्यक्तीने कन्नड शहरातून ही दारू विकत घेतली; मात्र ही दारू पिल्यानंतर त्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करावे लागले. त्या व्यक्तीस वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला, असे त्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ही दारू पिताच रिॲक्शन सुरू होते, असे या व्यक्तीने सांगितले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol is being sold clandestinely.