esakal | शरद पवारांची जादू : 54 मार्क पडणाराही मेरिटमध्ये येतो, कोण कोणास म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

मुल्यांकनाचा विषय निघाला म्हणून सांगतो. सरांना सांगायचेय सध्याचे युग हे असं आहे कि, 105 मार्क पडले तो मागच्या बेंचवर असतो, आणि 54 मार्क जरी पडले तरी तो मेरिट असतो. ही जादू फक्‍त शरद पवार करु शकतात. हे तुम्हाला माहितच आहे.

शरद पवारांची जादू : 54 मार्क पडणाराही मेरिटमध्ये येतो, कोण कोणास म्हणाले...

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : सध्याचे युग हे असं आहे कि, 105 मार्क पडले तो मागच्या बेंचवर असतो, आणि 54 मार्क जरी पडले तरी तो मेरिट असतो. ही जादू फक्‍त शरद पवार करु शकतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते अमोल मिटकरी यांनी राजकीय वास्तवावर मार्मिकरित्या बोट ठेवले. 

वक्‍तृत्व हे नेतृत्व असते. ज्या माणसाकडे वक्‍तृत्व कला असते, त्या माणसाकडे सत्ता येते. राज ठाकरे यांच्याकडे वक्‍तृत्व आहे. पण ते आता काही कामाचे नाही. इंजिन गेले ना तिकडे. असे म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही टोला लगावला.

राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण आयोजित "मराठवाड्याचा युवावक्‍ता' स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात शुक्रवारी (ता. 25) ते देवगिरी महाविद्यालयात बोलत होते. श्री. मिटकरी म्हणाले, परवा तर राज ठाकरेंचे ऐकले असेलच, आता त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिला नाही. छत्रपतींना सोयीने वापरायचे. युपी, बिहारच्या लोकांना वापरायचे. कट्टर मराठी बांधव इथे असतील तर समजून जा, जास्त यांच्या नका नादाला लागू.

वाचा - वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

त्यांचे मराठी प्रेम लय उफाळून येते. मराठी आपली मायबोली आहे. तिचा आदर झालाच पाहिजे पण इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, ती आली पाहिजे. संस्कृत कळले पाहिजे. हिंदी, पाली, कन्नड कळावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोवती वलय होते. शिवनेरीला मराठी बोलणारे, कर्नाटकात कन्नड बोलणारे होते. खेड शिवापुरला जिजाऊसोबत काही वर्ष महाराज राहिले, तिथे संस्कृत भाषा अवगत केली. अनेक भाषांचे ज्ञान त्यांना होते. संभाजी महाराजांना, डॉ. बाबासाहेबांना आहे. त्यांचा वारसा तुम्ही मानता तर, एकाच भाषेची कास का धरायची? असा प्रश्‍न श्री. मिटकरी यांनी उपस्थित केला.

मोदींना लबाडाची उपमा
वक्‍तृत्व हे नेतृत्व असते. ज्या माणसाकडे वक्‍तृत्व कला असते, त्या माणसाकडे सत्ता येते. बोलणारा मग लबाड असला तरी, येतात. उदाहरण सांगायचे तर, "बचपण में मै जब छोटा था' असं सांगणारे देशाचे नेतृत्व करत आहेत. वक्‍तृत्व आहे म्हणून त्यांच्याकडे नेतृत्व आले. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.

इथे चालते पवारांची जादू
मुल्यांकनाचा विषय निघाला म्हणून सांगतो. सरांना सांगायचेय सध्याचे युग हे असं आहे कि, 105 मार्क पडले तो मागच्या बेंचवर असतो, आणि 54 मार्क जरी पडले तरी तो मेरिट असतो. ही जादू फक्‍त शरद पवार करु शकतात. हे तुम्हाला माहितच आहे.

आरतीला येण्याची कृपा करा..
वक्‍ता म्हणून प्रचंड आदर गेल्या बारा वर्षात मिळतो आहे. जीवनात कुठलीही स्पर्धा न करणारा मी वक्‍ता आहे. कधी कुणी माईक हातात दिलाच नाही. कुणी संधी दिलीच नाही. पण, संधी शोधत होतो. पहिली संधी; गावात जे गणपती मंडळे असतात, तिथे लोक आरतीला लेट येतात. त्यावेळी कुणी नसायचे मंडपात. एकतर गणपती आणि मीच असायचो. तिथं माईक हातात घेऊन म्हणायचो. आरतीची वेळ झालेली आहे. तरी सर्व लोकांनी आरतीला येण्याची कृपा करावी. आरतीची वेळ झालेली आहे. हा आपल्या जीवनाचा टप्पा.

बस आगारात लागली आहे...
सुरवातीपासून माईकचा छंद आहे. कुठं बसस्टॅंडला गेलो, तो अनाऊंसर तिथं हजर नसला कि, मी पटकन तिथे घुसायचो. "बस क्रमांक 7013, आगारामध्ये लागलेली आहे. असं करायचो. असं करत करत मी माईकपर्यंत आलो. गावपातळीपासून सुरवात केली ते आज इथपर्यंत पोचलो आहे. आज मला इथे सन्मानाने बोलावले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात राज्यातील मोठमोठे वक्‍ते येऊन गेले, जे इथे आले महाराष्ट्रात चमकले. तिथे ही संधी मिळाली. त्यामुळे मला भविष्य चांगले आहे.

हेही वाचा : सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट "झिरो पॅड'ने झाली सहजशक्‍य