Corona Virus : लॉकडाऊनमध्ये मोकाट कुत्र्यांचा विचार करणारी कोण ही तरूणी 

Aurangabad news
Aurangabad news
Updated on

औरंगाबाद : घरातला पाळीव कुत्रा आज शहरी भागात घरातील एक सदस्यच बनला आहे. मात्र रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या नशीबी सतत हाडहाडच असते. आता तर लॉकडाऊनमुळे त्यांना कुणी खायलाही टाकत नाही. 

मात्र मोकाट कुत्र्यांविषयी कणव असणारी अमृता लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांना दररोज सकाळचे जेवण देत आहे. तिच्या या कामात आई वडीलही साथ देत आहेत. 
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि घरातील पाळीव कुत्र्यांची अधिक काळजी घेत पशुप्रेमींनी त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना कुणी हॉटेलवाले, कोणत्या घरापुढे मिळणारा भाकरीचा, ब्रेडचा तुकडादेखील मिळणे दुर्लभ झाले. अशा परिस्थितीत प्राणीमात्रांविषयी आपुलकी, प्रेम वाटणाऱ्या पीपल फॉर अॅनिमल संस्थेचे स्थानिक पदाधिकारी, सदस्य पुढे सरसावले आहेत. 

लॉकडाऊनमध्ये अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचे लोक गरजू लोकांपर्यंत तयार अन्नाची पाकीटे, धान्य, किराणा साहित्य देत आहेत. त्यांचे मदत देतानाचे फोटो माध्यमांमध्ये झळकत आहेत. चालत्या बोलत्या माणसांना तर अशा प्रसंगी कोणीही मदत करण्यास पुढे येतील आणि ते गरजेचेही असते. 

मात्र कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, कोणताही स्वार्थ न ठेवता रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांसाठी अन्न देण्याचे काम पीपल फॉर अॅनिमल संस्थेचे प्राणिप्रेमी सदस्य करत आहेत. जे प्राणिप्रेमी सदस्य या कुत्र्यांच्या अन्नाची व्यवस्था करू शकतात ते स्वत:च्या खिशातुन करत आहेत मात्र ज्यांना शक्य नाही त्यांना काही हॉटेल व्यवसायिक, पशुप्रेमी अन्न तयार करून देत आहेत. 

काय करते अमृता...

अशाच स्वखर्चातुन या मुक्या जीवांना दररोज सकाळी डॉगफुड देण्याचे काम करत आहेत अमृता दौलताबादकर. त्या पीपल फॉर अॅनिमलच्या इथल्या शाखेच्या सचिव आहेत. सकाळी पावणेसात वाजता त्या वडील सतीश दौलताबादकर यांच्यासोबत भात, डॉगफुड घेऊन कारने निघतात. घराच्या परिसरातील कुत्रे त्यांची चाहूल लागताच घराजवळ गर्दी करतात. त्यांना भात आणि डॉगफुड दिल्यानंतर पुढे औरंगपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माराठवाडा विद्यापीठ गेट परिसर या ठिकाणी कुत्र्यांना अन्न देतात. 

सध्या लॉडाऊन असल्याने विद्यापीठात चारचाकी नेता येत नसल्याने त्यांची आई निशा तोपर्यंत तिथे दुचाकी घेऊन येऊन थांबतात. त्यानंतर अमृता दौलताबादकर कुत्र्यांसाठी अन्न घेऊन दुचाकीवर विद्यापीठात फिरून मोकाट कुत्र्यांना खायला देतात. पावणेनऊपर्यंत ५० ते ६० कुत्र्यांना खायला देऊन त्या परत घरी येतात. 

आजोबा आधी कुत्र्याला खाऊ घालायचे मग जेवण करायचे. वडीलही गोशाळांना सतत दानधर्म करतात. यामुळे साहजिकच प्राण्यांविषयी माझीही आवड वाढत गेली. कुत्र्यापासून कोरोना होतो हा खूप मोठा गैरसमज आहे. मला जेवढे शक्य आहे तेवढे करते, मात्र यासाठी इतरांनीही पुढे आले पाहिजे. कुत्र्यांना दोन तीनवेळा भाकर दिली तर तो कधी देणाऱ्यावर कधी भुंकणार नाही. आपुलकी, प्रेम हे वाढत जाते. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाची ऐतिहासिक, पौराणिक दाखले दिले गेले आहेत. 
- अमृता दौलताबादकर, श्‍वानप्रेमी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com